“शेतकऱ्यांना मदत करणं ही राज्याची जबाबदारी, मुख्यमंत्र्यांकडून होत नसेल तर राज्यपालांना बोलतो”

शेतकऱ्यांना मदत करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची आहे. मुख्यमंत्र्यांकडून होत नसेल तर मी राज्यपालांना विनंती करु शकतो, असं संभाजीराजे म्हणाले.

"शेतकऱ्यांना मदत करणं ही राज्याची जबाबदारी, मुख्यमंत्र्यांकडून होत नसेल तर राज्यपालांना बोलतो"

पुणे : “मी शेतीतला तज्ज्ञ नाही. पण शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी अशी माझी भावना आहे. माझं-तुझं न करता शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची आहे. मुख्यमंत्र्यांकडून होत नसेल तर मी राज्यपालांना विनंती करु शकतो. तुम्ही याच्यात लक्ष घाला असं मी राज्यपालांना बोलू शकतो”, असं संभाजीराजे म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. (If Chief Minister cant i will speaks to Governor said Sambhaji Raje)

दौरा करुन चालणार नाही, ओला दुष्काळ जाहीर करा

छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. नुसते दौरे करुन काही होणार नाही. तर, लवकरात लवकर कॅबिनेट मिटिंग बोलवून पूरग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे, असं ते म्हणाले. राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभा ऊस अतिवृष्टीमुळे आडवा झाला. त्यामुळे कारखानदारांनी शेतातील ऊस उचलला पाहीजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विमा कंपन्यांना सर्वात आधी जबाबदार धरावं     

राज्यात अजून पूर्ण पंचनामे झाले नाहीत. अधिकारी चावडीवर बसून पंचनामे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत मिळत नाही. यासाठी विमा कंपन्यांना सर्वात आधी जबाबदार धरलं पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच युद्धपातळीवर पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची त्यांनी मागणी केली.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावर बोलण्यास नकार

दरम्यान, भाजपचे माजी एकनाथ खडसे यांनी आज (21 ऑक्टोबर) राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसेंच्या पक्षांतराबद्दल संभाजीराजे यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. “मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझी कारकीर्द संपल्यावर मी त्यावर बोलेन” असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

“मी मुंडेंच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली, मला पक्ष सोडायला लावला, आता खडसेंनाही तेच”

संभाजीराजेंनी OBC कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नये, नापास होतील : प्रकाश शेंडगे

सिबील गेलं खड्ड्यात, अधिकार वापरुन शेतकऱ्यांना कर्ज द्या, कुंभारवाडीतून संभाजीराजेंचा बँक अधिकाऱ्यांना फोन

(If Chief Minister cant i will speaks to Governor said Sambhaji Raje)

Published On - 9:18 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI