"मी मुंडेंच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली, मला पक्ष सोडायला लावला, आता खडसेंनाही तेच"

मी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली असता, माझ्यावर पक्ष सोडायची वेळ आली. माझं तिकीट कापण्यात आलं, असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

"मी मुंडेंच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली, मला पक्ष सोडायला लावला, आता खडसेंनाही तेच"

मुंबई : एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातल्या भाजप नेत्यांनी मला पक्ष सोडायला लावला. मी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली असता, माझ्यावर पक्ष सोडायची वेळ आणली. माझं तिकीट कापण्यात आलं, असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्यावरही माझ्यासारखीच वेळ आल्याचे सांगत, भाजपविषयी असलेल्या खदखद त्यांनी मोकळी केली. प्रकाश शेंडगे हे भाजपचे माजी आमदार असून ते ओबीसी समाजाचे नेते आहेत. (Prakash Shendage said demanded inquiry into Gopinath Munde’s accident. They forced me to leave party )

“गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी काम केले. मुंडेंसोबत ओबीसी समाजाचे अनेक नेते होते. एकनाथ खडसेसुद्धा त्यापैकीच एक आहेत. गोपीनाथ मुंडेंचा जेव्हा अपघात झाला; तेव्हा त्यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मी मागणी केली होती. माझ्या या मागणीमुळेच मला पक्ष सोडावा लागला. तसेच माझं तिकीट कापण्यात आलं. आता तीच वेळ एकनाथ खडसेंवर आली आहे.” असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराचा मुद्दा महाराष्ट्रभर गाजतोय त्याबद्दल बोलताना खडसेंनी पक्षांतराला थोडा उशीरच केल्याचं ते म्हणाले. तसेच त्यांनतर तुमचीच मूठ जात्यात असेल, अशी कल्पना एकनाथ खडसेंना याआधीच दिली होती, असंही त्यांनी सांगितलं. तसेच उशीर झाला असला तरी, देर आए दुरुस्त आए असं म्हणत, त्यांनी खडसेंच्या पक्षांतराचं समर्थन केलं.

नाथाभाऊंच्या रुपाने सुरुवात, बहुजनांना मान सन्मान द्यायला हवा

शेंडगे यांनी भाजपमध्ये बहुजनांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप केला.भाजपला महाराष्ट्रात शेटजी-भटजीचा पक्ष म्हणायचे. गोपीनाथ मुंडेंनी या पक्षाला बहुजनांचा चेहरा बनवला. तसेच हा पक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवत त्याला सत्तेपर्यंत नेलं असं त्यांनी सांगितलं. तसेच खडसेंना भाजपसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपचा सरपंचही निवडून येत नव्हता, तेव्हापासून त्यांनी भाजपसाठी काम केलेलं आहे, असे म्हणत 40 वर्षे काम केल्यानंतर एका विशिष्ट नेत्यामुळे त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हे सारं दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी ओबीसी सामाजासाठी विविध मागण्या केल्या आहेत. 3 नोव्हेंबरपर्यंत त्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीसांनी खडसेंवर अन्याय केला नाही: गिरीश महाजन

यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाची दगडं का निसटत आहेत?; खडसेंच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

‘टिक टिक वाजते…’ खडसेंच्या राजीनाम्यानंतर कन्या रोहिणी खडसेंचा फेसबुकवर सूचक फोटो

(Prakash Shendage said demanded inquiry into Gopinath Munde’s accident. They forced me to leave party )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *