'टिक टिक वाजते...' खडसेंच्या राजीनाम्यानंतर कन्या रोहिणी खडसेंचा फेसबुकवर सूचक फोटो

एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खडसे यांनी मनगटावरील घड्याळाकडे बघतानाचा फोटो फेसबुकवर शेअर करत राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत दिले आहेत

'टिक टिक वाजते...' खडसेंच्या राजीनाम्यानंतर कन्या रोहिणी खडसेंचा फेसबुकवर सूचक फोटो

मुंबई : एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. खडसे यांच्या सूनबाई अर्थात भाजप खासदार रक्षा खडसे पक्षातच राहणार आहेत. मात्र त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनाही राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध लागल्याचे दिसत आहे. (Eknath Khadse Daughter Rohini Khadse Khewalkar shares new photo on Facebook as father joins NCP)

रोहिणी खडसे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर नवा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या मनगटावरील घड्याळाकडे बघताना दिसतात. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचा फोटो ठेवत त्यांनी एकप्रकारे आपली पुढील राजकीय वाटचालच सांगितली आहे.

Adv Rohini Eknathrao Khadse यांनी वर पोस्ट केले बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

“विधानसभेला पाडण्याचा पक्षातूनच प्रयत्न”

“विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरही मला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनही भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती.” अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

“40 वर्ष ज्या व्यक्तीने पक्षनिष्ठेने काम केलं त्यांना हा निर्णय घेताना दुःख होणं स्वाभाविक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाथाभाऊंनी उत्तर महाराष्ट्र मध्ये पक्ष उभा केला.” अशा भावना रोहिणी खडसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केल्या. मीही सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ :

रक्षा खडसे भाजपातच

“मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही” असं रक्षा खडसे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं. (Eknath Khadse Daughter Rohini Khadse Khewalkar shares new photo on Facebook as father joins NCP)

एकनाथ खडसेंच्या सून असलेल्या रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत. रक्षा खडसे भाजप  सोडणार नाहीत त्या भाजपमध्येच राहतील, खडसे म्हणाले. खडसेंनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे  उदाहरण दिले.

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रकाश मेहतांचा निर्धार

देवेंद्र फडणवीस ते शिवसेना, NCP; एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

(Eknath Khadse Daughter Rohini Khadse Khewalkar shares new photo on Facebook as father joins NCP)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *