एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रकाश मेहतांचा निर्धार

एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, असं खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते आणि माजी मंत्री प्रकाश मेहता म्हणाले आहेत.

एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रकाश मेहतांचा निर्धार

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आपल्या मनगटावर घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्यासोबत माजी मंत्री प्रकाश मेहता देखील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय प्रकाश मेहतांना आवडलेला नाही. एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. (Prakash Mehta On Eknath Khadase join NCP)

“पक्षात कोणतेही निर्णय एक व्यक्ती घेत नाही. एका व्यक्तीला दोष देऊन आपण पळवाट काढावी हे योग्य नाही. पक्षाच्या विचारानुसार काम करत असताना मतभेद असतात मात्र मनभेद नसावेत. कोणतेही कारण देऊन पक्षावर दोष देणे योग्य नाही असं मला वाटतं”, असं खडसेंच्या राजीनाम्यानंतर प्रकाश मेहता म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या वाट्याला अशी दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती येऊ नये असं वाटतं, असं प्रकाश मेहता म्हणाले.

“भारतीय जनता पार्टीच्या उभारणीमध्ये खडसेंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आज सुद्धा पक्षात राहून काम करावं अशी माझी इच्छा आहे. मात्र खडसेंनी त्यांचा निर्णय घेतला आहे. त्यांना आमच्याकडून शुभेच्छा”, असं मेहता म्हणाले.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर प्रकाश मेहतांच्या भविष्याविषयी विचारलं असता ते म्हणाले, “माझे प्रश्न असू शकतात. नाराजी असू शकत नाही. माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत असल्याने आणि भविष्यात जरी नाही आले तरी पक्षाच्या विचारावर कधीच त्रास होणार नाही. मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही”.

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं म्हणत एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला. मात्र खडसेंच्या या मताशी आपण सहमत नाही. पक्षात कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नाही, असं म्हणत मेहतांनी फडणवीसांची पाठराखण केली.

एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला. शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. तसंच खडसेंनी देखील पत्रकार परिषद घेऊ आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

फडणवीसांनी छळलं, त्यांच्यामुळेच भाजपला सोडचिठ्ठी

“मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी छळले, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला” असं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse first reaction after left BJP)

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले.

(Prakash Mehta On Eknath Khadase join NCP)

संबंधित बातम्या

Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले… 

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *