AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Khadse | एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

एकनाथ खडसेंच्या सून असलेल्या रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या पक्षाला सोडचिठ्ठी देणार नाहीत

Raksha Khadse | एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात...
| Updated on: Oct 21, 2020 | 4:49 PM
Share

नवी दिल्ली : एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. सासरेबुवांनी व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली, मात्र भाजपमध्येच राहणार असल्याचं भाजप खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी सांगितलं. (Raver MP Raksha Khadse to stay in BJP)

“मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही” असं रक्षा खडसे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं.

“मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले. मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रक्षा खडसे भाजप सोडणार नाहीत. तो त्यांचा निर्णय आहे, असे खडसेंनी स्पष्ट केले.

एकनाथ खडसेंच्या सून असलेल्या रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत. रक्षा खडसे भाजप  सोडणार नाहीत त्या भाजपमध्येच राहतील, खडसे म्हणाले. खडसेंनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे  उदाहरण दिले.

एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले.

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, 40 वर्ष काम केलं, खेड्यापाड्यात भाजप पोहोचली नव्हती, मुंडे, महाजन, गडकरी, फरांदे, फुंडकर, मुनंगटीवार यांच्यासोबत प्रामाणिक काम, पक्षाने अनेक मोठी पदं दिली, भाजपवर रोष नाही, केंद्रीय नेत्यावर कधीही टीका केली नाही, असे खडसेंनी सांगितले.

छळाला मर्यादा नव्हत्या, पण मी सहन केले, भ्रष्टाचाराचा आरोप केला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन, तरीही माझा राजीनामा घेतला गेल्याचे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले.

भाजप किंवा केंद्रीय नेतृत्वाविषयी तक्रार नाही, देवेंद्रजी यांनी माझ्या चौकशा लावल्या, याचा मनस्ताप प्रचंड, नाईलाजाने विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा लागल्याचं फडणवीसांनी सांगितलं, बदनामी झाली तरी चार वर्ष काढली, अशी भावना एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. (Raver MP Raksha Khadse to stay in BJP)

संबंधित बातम्या :

…तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेन, भाजप राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

(Raver MP Raksha Khadse to stay in BJP)

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.