…तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेन, भाजप राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान

'माझी अनेक चौकशी झाली. खोटे आरोप करण्यात आले. विनयभंगाचा आरोप केला. फडणवीसांनी स्वत गुन्हा नोंद करायला सांगितले'

...तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेन, भाजप राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान

जळगाव : भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा पक्षात जात असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. पण कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्यावर टीका केली नसून कोणीही राजीनाम्याची मागणी केली नव्हती. चौकशीचीही मागणी केली नव्हती. तुम्ही रेकॉर्ड तपासा असं विधान असेल तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेल’ असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. (eknath khadse first reaction after resign bjp jalgaon eknath khadse ncp)

‘आज मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेले 40 वर्ष भाजपचं काम करत होतो. या 40 वर्षात अनेक प्रसंग आले. भाजप खेड्यापाड्यात पोहोचलेली नव्हती. भाजप उपेक्षित होती, त्यावेळपासून आजतागायत भाजप पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आलो. भाजपनेदेखील या कालखंडात मला मोठ्या प्रमाणात राजकारणात अनेक पदं दिली. ते मी नाकारु शकत नाही. भाजपबद्दल माझ्या मनात कोणताही रोष नाही. मी भाजपच्या कोणत्या केंद्रीय नेत्यावर किंवा पक्षावर टीका केली नाही.’ असंही यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

खडसे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे – माझी अनेक चौकशी झाली. खोटे आरोप करण्यात आले. विनयभंगाचा आरोप केला. फडणवीसांनी स्वत गुन्हा नोंद करायला सांगितले.

(eknath khadse first reaction after resign bjp jalgaon eknath khadse ncp) – छळ किती करावा याला मर्यादा नव्हत्या तरी मी ते सहन केले. माझा दावा आहे, की माझं रेकॉर्ड काढा. कोणीही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. कोणीही चौकशीची मागणी केली नव्हती तरीही चौकशी केली. जर असं झालं असेल तर मी राजकारण सोडेन.

– पक्षासाठी 40 वर्ष मी काम केलं. नाथाभाऊंनी त्यांच्या 40 वर्ष दिली आहे.

– मला चौकशीचा त्रास झाला. यापेक्षा मरणयातना चांगल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी मला नाईलाजांनी सांगितले, असे सांगितले.

“डेंजरपणे हिशेब चुकते करण्याची खडसेंची ख्याती, गिरीश महाजनांना थेट आव्हान”

– मला काय मिळालं याच्याशी मला लेण-देणं नाही. माझा कथित पीएवर नऊ महिने पाळत ठेवली

– दमानिया यांनी त्यांचा विनयभंग केल्याचा खोटो खटला दाखल केला. पोलीस त्यावेळी तयार नव्हते. दमानिया यांनी पोलीस स्टेशनला रात्रभर गोंधळ घातला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगितला. वास्तविक अशा स्वरुपाचे खोटे गुन्हे नोंद करायला सांगणं चुकीचं आहे. या खटल्यातून मी नुकतंच 15 दिवसापूर्वी बाहेर आलो. छळ किती करावा याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या. तरीही इतके दिवस मी सहन करत आलो.

(eknath khadse first reaction after resign bjp jalgaon eknath khadse ncp)

Published On - 2:17 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI