डॉक्टरांचा देशव्यापी संप, कोणकोणत्या वैद्यकीय सेवा बंद?

| Updated on: Dec 11, 2020 | 8:54 AM

डॉक्टरांच्या अर्ध्या दिवसाच्या संपकाळात सर्व गैरकोव्हिड आणि गैरआपत्कालीन सेवा ठप्प राहणार आहेत.

डॉक्टरांचा देशव्यापी संप, कोणकोणत्या वैद्यकीय सेवा बंद?
Follow us on

मुंबई : आज (शुक्रवार 11 डिसेंबर) तुम्ही डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्हाला तुमची अपॉईंटमेंट पुढे ढकलावी लागण्याची चिन्हं आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सुरु झालेला हा संप संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात सर्व गैरकोव्हिड आणि गैरआपत्कालीन सेवा ठप्प राहणार आहेत. शिवाय ओपीडीही बंद ठेवण्याचं आवाहन IMA कडून करण्यात आलं आहे. तर सर्व नॉन इमर्जंन्सी हेल्थ सेंटर, इलेक्टिव सर्जरीही न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (IMA Doctors nationwide strike which medical facilities to remain close)

कोणकोणत्या सेवा बंद ठेवण्याचं आवाहन?

सर्व दवाखाने
सर्व नॉन इमर्जंन्सी हेल्थ सेंटर
सर्व ओपीडी
इलेक्टिव सर्जरी

आरोग्य यंत्रणेतील काही सेवा-सुविधा सुरळीत सुरु राहणार आहेत. त्यात अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, कोव्हिड केअर सेंटर, सीसीयू, अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरु राहणार आहेत.

कोणकोणत्या सेवा सुरु राहणार?

अत्यावश्यक आरोग्य सेवा
अतिदक्षता कक्ष
कोविड केअर सेंटर
सीसीयू
अत्यावश्यक शस्त्रक्रिया

(IMA Doctors nationwide strike which medical facilities to remain close)

हा संप कशासाठी?

सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संस्थेने एक नोटिफिकेशन काढलं. या नोटिफिकेशनमध्ये आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यास शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली गेली. नोटिफिकेशनमध्ये 58 प्रकारच्या शस्रक्रियांची परवानगी दिली गेली आहे.

यामध्ये साध्या शस्त्रक्रियांशिवाय मेंदूच्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे. यालाच इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. IMA च्या म्हणण्यानुसार ही मिक्सोपॅथी असून यामुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळेच हा संप पुकारण्यात आला आहे.

नवे नियम काय सांगतात?

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना सध्या शस्त्रक्रियेबाबत शिकवलं जातं. पण ते एखादी शस्त्रक्रिया करु शकतात की नाही, याबाबत कुठलीही स्पष्ट नियमावली नव्हती. आता केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार आता आयुर्वेदाचे डॉक्टरही शस्त्रक्रिया करु शकणार आहेत. सरकारच्या निर्देशानुसार आयुर्वेदाच्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता डोळे, कान, नाक आणि घशाच्या शस्त्रक्रियेसाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आयुर्वेदाच्या डॉक्टरांना ग्लुकोमा, मोतीबिंदू, स्तनाची गाठ, अल्सर आणि पोटासंबंधी काही शस्त्रक्रियाही करता येणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या परवानगीविरोधात IMA आक्रमक

आधी आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी, आता आयुष मंत्रालयाचं निर्णयावर स्पष्टीकरण

(IMA Doctors nationwide strike which medical facilities to remain close)