कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

| Updated on: Oct 20, 2020 | 6:31 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन, कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे सतर्कता बाळगा, लस येईपर्यंत ढिलाई नको, असं आवाहन केलं.

कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन, कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे सतर्कता बाळगा, लस येईपर्यंत ढिलाई नको, असं आवाहन केलं. गेल्या सात-आठ महिन्यात भारताने कोरोनावर चांगलं नियंत्रण मिळवलं आहे. ही परिस्थिती आपल्याला कायम ठेवायची आहे. देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे अजूनही सतर्कता बाळगा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. (Important points of PM Modi Speech )

कोरोनाची लस अद्याप आलेली नाही.  देशाचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. आपल्या काही व्हॅक्सिन चाचणीच्या पुढच्या टप्प्यात आहेत. प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारची पूर्ण तयारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे (PM Modi Speech)

  • अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी होता-होता चिंताजनक पद्धतीने वाढली
  • भारताचा रिकव्हरी रेट चांगला
  • अमेरिका-ब्राझिलमध्ये आकडा मोठा
  • मृत्यू दर इतर देशात जास्त
  • भारतानं जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला
  • 90 लाखापेक्षा जास्त बेड आपल्याकडे उपलब्ध
  • 12 हजार क्वारंटाईन सेंटर
  • 2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु
  • कोरोनाचं संकट गेलं असं म्हणण्याची वेळ नाही
  • विना मास्क तुम्ही कुटुंबाला संकटात टाकतायत
  • अमेरेकेसह काही देशात अचानक कोरोना केसेस वाढतायत
  • पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत लढाई कमकुवत होऊ देऊ नका
  • आपल्या देशाचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत
  • आपल्या काही व्हॅक्सिन चाचणीच्या पुढच्या टप्प्यात आहेत
  • प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न
  • सरकारची त्यासाठी पूर्ण तयारी
  • लॉकडाऊन गेला, कोरोना नाही, विनामास्क फिरुन कुटुंबाला संकटात टाकू नका

(Important points of PM Modi Speech )

संबंधित बातम्या 

…तरच कोरोनाचं संकट टळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला ‘उपाय’  

कोरोनाचं संकट कायम, जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही : पंतप्रधान मोदी