कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर आयकरची धाड

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

कोल्हापूर: आयकर विभागाकडून कोल्हापुरातील ‘गोकुळ’ दूध संघाची चौकशी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्राप्तीकराची रक्कम कमी भरल्याने काल जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाची आज प्राप्तीकर विभागाने चार तासाहून अधिक काळ चौकशी केली. या चौकशीसाठी सायंकाळी चार वाजता एका महिला अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक संघाच्या गोकुळ शिरगांव येथील कार्यालयात आले. […]

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर आयकरची धाड
Follow us on

कोल्हापूर: आयकर विभागाकडून कोल्हापुरातील ‘गोकुळ’ दूध संघाची चौकशी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्राप्तीकराची रक्कम कमी भरल्याने काल जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाची आज प्राप्तीकर विभागाने चार तासाहून अधिक काळ चौकशी केली. या चौकशीसाठी सायंकाळी चार वाजता एका महिला अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक संघाच्या गोकुळ शिरगांव येथील कार्यालयात आले.  मात्र हा नियमित तपासणीचा भाग असल्याचे ‘गोकुळ’ च्या अधिकृत्त सूत्रांनी सांगितले.

“गोकुळ’ ला दर महिन्याला प्राप्तीकराची रक्‍कम भरावी लागते. गेल्या महिन्यात सुमारे पाच कोटी रूपये कमी भरल्याचे समजते. त्यामुळे प्राप्तीकर विभागाने काल संघाच्या कार्यालयात चौकशी केली. संघातून विक्री केलेला माल, प्रत्यक्ष उत्पादन, माल कोणाला विकला, त्यातून किती नफा मिळाला यासंदर्भातील कागदपत्रे या पथकाने तपासली.

सुमारे चार तासांच्या चौकशीनंतर संघाने पाच कोटी रूपये प्राप्तीकर कमी भरल्याचे आढळून आल्याचे समजते. एवढी रक्कम भरावी अशी नोटीसही संघाला दिल्याचे वृत्त आहे. प्राप्तीकर विभागाची ही नियमित तपासणी असल्याचे ‘गोकुळ’च्या सूत्रांनी सांगितले.