भारताचा चीनला आणखी एक झटका, चीनकडून आयातीपेक्षा निर्यातीची टक्केवारी वाढली

| Updated on: Dec 07, 2020 | 6:56 PM

भारतात चीनमधून होणऱ्या आयातीमध्ये 13 टक्के घट झाली आहे. तर, चीनला होणाऱ्या निर्यातीत 16 टक्के वाढ झालीय. (Indian China import export )

भारताचा चीनला आणखी एक झटका, चीनकडून आयातीपेक्षा निर्यातीची टक्केवारी वाढली
Follow us on

नवी दिल्ली: भारतानं चीनला अ‌ॅपबंदी पाठोपाठ आणखी एक धक्का दिला आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर तणाव वाढल्यानंतर चीनमधून होणऱ्या आयातीमध्ये 13 टक्के घट झाली आहे. तर, चीनला होणाऱ्या निर्यातीत 16 टक्के वाढ झालीय. (India import reduce and export increased with china during last months )

हिंदुस्थान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार भारतानं चायनीज अ‌ॅप बंदी पाठोपाठ चीनला दिलेला हा मोठा धक्का आहे. मात्र, चीनच्या कस्टम विभागानं याबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. चिनी माध्यमांतून भारताला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाल्याचं दाखवण्यात आलं आहे पण, भारतानं चिनी वस्तूंच्या आयातींमध्ये घट केली आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चिनी सैन्यात जून महिन्यात झटापट झाली होती.त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले आहेत.

चीनमधील ग्लोबल टाईम्समधून दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणि निर्यातीत झालेली घट यासाठी कोरोनाला जबाबदार ठरवले आहे. कोरोना विषाणू ससंर्गामुळे भारतातून होणारी मागणी घटल्याचे सांगण्यात आलंय. (India import reduce and export increased with china during last months )

भारताची चीनकडून आयात 13 टक्केंनी कमी झालीय तर निर्यात 16 टक्क्यांनी वाढली आहे. चिनी जाणकारांच्या मते सीमाप्रश्नावरुन भारतानं राजकारण केल्यामुळं हे झाल आहे. भारत सरकारची चीन बद्दलची पक्षपाती भूमिका देखील कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

2019 मध्ये भारत अमेरिका, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, तैवान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, मलेशिया, ब्राजील आणि रशियानंतर 12 व्या क्रमांकाचा आयातदार देश होता. चीनमधील भारतीय दुतावासाच्या माहितीनुसार कार्बन रसायने, उर्वरक, अँटीबायोटिक्स इत्यादी वस्तू भारतात निर्यात करण्यात येत होत्या. (India import reduce and export increased with china during last months )

गलवान खोऱ्यातील झटापटीनंतर तणाव वाढला

भारत आणि चीनमधील तणाव वाढण्यास गलवान खोऱ्यात झालेली घटना कारणीभूत आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात जून महिन्यात भारत आणि चीनच्या पब्लिक लिबरेशन आर्मीच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये भारतातील 20 जवानांना जीव गमवावा लागला. त्यानंत दोन्ही देशांमधील तणाव वाढला. यानंतर भारतानं चायनीज अ‌ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या:

चीन ‘सुपर सोल्जर्स’ची तुकडी उभारणार? सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी बायोलॉजिकल टेस्ट

चीनच्या घुसखोरीला कंटाळून जपानचा मोठा निर्णय, ड्रॅगनला रोखण्यासाठी अमेरिका, फ्रान्सशी जवळीक वाढवणार

(India import reduce and export increased with china during last months )