पाकिस्तानमधील भारतीय अधिकाऱ्यांचा छळ, परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

नवी दिल्ली : भारताच्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांचा पाकिस्तानकडून छळ होत असल्याचा आरोप आहे. याविरोधात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवाय या घटनांची तातडीने चौकशी करण्याची मागणी भारताने केली आहे. भारताने बुधवारी अधिकृतपणे याविरोधात भूमिका जाहीर केली. सूत्रांच्या मते, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला 18 मार्च रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक नोट व्हर्बल जारी (डिप्लोमॅटिक पत्र) […]

पाकिस्तानमधील भारतीय अधिकाऱ्यांचा छळ, परराष्ट्र मंत्रालय आक्रमक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नवी दिल्ली : भारताच्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांचा पाकिस्तानकडून छळ होत असल्याचा आरोप आहे. याविरोधात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवाय या घटनांची तातडीने चौकशी करण्याची मागणी भारताने केली आहे. भारताने बुधवारी अधिकृतपणे याविरोधात भूमिका जाहीर केली.

सूत्रांच्या मते, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला 18 मार्च रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक नोट व्हर्बल जारी (डिप्लोमॅटिक पत्र) केलं आहे, ज्यात दोन पाकिस्तानी कर्मचाऱ्यांकडून भारतीय नौदलाच्या सल्लागारांचा पाठलाग केल्याप्रकरणी सविस्तर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. नौदलाचे सल्लागार त्यांच्या घरातून उच्चायुक्तालयात जात असताना दोन पाकिस्तानी कर्मचाऱ्यांनी एका कारमधून त्यांचा पाठलाग केल्याचं नोट व्हर्बलमध्ये म्हटलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या पाकिस्तानमधील एका अधिकाऱ्याला फेक कॉल करुन त्रास देण्यात आला, तर एका कर्मचाऱ्याला 14 मार्च रोजी एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याच्या रोषाचा सामना करावा लागला.

भारतीय अधिकाऱ्यांचा जो छळ केला जातोय, त्याची पाकिस्तानने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी भारताने केली आहे. भारताने 13 मार्च रोजीही पाकिस्तानला अशाच पद्धतीची नोट व्हर्बल जारी केली होती, ज्यात 8 ते 11 मार्च या काळात भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांचा छळ केल्याप्रकरणी आक्षेप नोंदवण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.