एयरफोर्समध्ये फ्लाईट लेफ्टनंट, भारतीय संघाकडून बोलावणं, मग टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार

| Updated on: Jun 15, 2021 | 7:13 PM

भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तब्बल सात वर्षानंतर महिला क्रिकेटपटू कसोटी सामना खेळणार आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये शिखा पांडेची (Shikha Pandey) ओळख एक उत्तम अष्टपैलू खेळाडू अशी आहे. ती मध्यमगतीने गोलंदाजी करुन खालच्या फळीत फलंदाजीतही चांगल्या धावा करते.

एयरफोर्समध्ये फ्लाईट लेफ्टनंट, भारतीय संघाकडून बोलावणं, मग टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार
शिखा पांडे
Follow us on

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तब्बल सात वर्षानंतर महिला क्रिकेटपटू कसोटी सामना खेळणार आहेत. याआधी शेवटची कसोटी भारतीय महिलांनी 2014 साली इंग्लंडविरुद्धच खेळली होती. ज्यात भारताने विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान बऱ्याच इंटरेस्टींग घटना घडल्या होत्या. ज्यातील एक म्हणजे एयरफोर्समधील फ्लाईट लेफ्टनंटचं पदावर असणारी शिखा पांडे (Shikha Pandey) अचानक भारतीय संघात सामिल झाली. सामन्यात शिखाने 28 धावा करत तीन महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या होत्या. (Indian Women Cricketer Shikha Pandey Went From Air Force To Indian Cricket Team for England Test)

शिखा पांडेची ओळख एक उत्तम अष्टपैलू अशी आहे. ती मध्यमगतीने गोलंदाजी करुन खालच्या फळीत फलंदाजीतही चांगल्या धावा करते. इंजीनियरिंगचा अभ्यास केल्यानंतर शिखाने भारतीय एयरफॉर्समध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले. ज्यानंतर तिला फ्लाईट लेफ्टनंटची नोकरी देखील मिळाली. 2014 मध्ये फ्लाईट लेफ्टनंट असतानाच तिला भारतीय संघातून बदली खेळाडू म्हणून इंग्लंडच्या दौऱ्यासाठी खेळण्याची संधी मिळाली. तिने लगेचच होकार देत 2014 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. भारतीय संघ रवाना होण्यासाठी अवघे तीन दिवस असताना शिखाला फोन आल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

दोन दिवसांत एयरफॉर्स बेसवरुन इंग्लंडच्या विमानात

शिखाला भारतीय संघातून बोलावणं येताच ती लगेचच घराच्या दिशेने रवाना झाली. घरी पोहचून सामान वैगेरे घेऊन शिखा दोन दिवसांच्या आतच संघासोबत इंग्लडसाठी रवाना झाली. त्यामुळे अवघ्या 2 दिवसांतच एयरफॉर्स बेसवरुन ती इंग्लंडच्या विमानात रवाना झाली.

विकेट्स घेतल्यानंतर विजयी चौकारही लगावला

आपल्य सलामीच्या कसोटी सामन्यातच शिखाने आपली वेगळी छाप सोडली. पहिल्या डावात एक विकेट आणि केवळ 3 धावा करणाऱ्या शिखाने दुसऱ्या डावात मुसंडी मारली. दुसऱ्या डावात तिने दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताला विजयासाठी 181 धावांची गरज होती. त्यावेळी वरच्या फळीत उतरलेल्या शिखाने अखेरपर्यंत नाबाद राहत 28 धावांची चिवट खेळी खेळली. अखेर विजयी चौकार खेचत भारताला विजयश्री मिळवून दिला.

हे ही वाचा :

WTC Final : विजयी संघ होणार मालामाल, ICC च्या मानाच्या गदेसह मिळणार कोट्यावधी रुपये

WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

(Indian Women Cricketer Shikha Pandey Went From Air Force To Indian Cricket Team for England Test)