AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajpal Yadav: मोठी अपडेट! राजपाल यादवला जामीन की जेल? कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Rajpal Yadav: गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात असणारा अभिनेता राजपाल यादव प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Rajpal Yadav: मोठी अपडेट! राजपाल यादवला जामीन की जेल? कोर्टाने घेतला मोठा निर्णय
| Updated on: Feb 16, 2026 | 4:00 PM
Share

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून राजपाल यादवला मोठा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाने 18 मार्च पर्यंत राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तक्रार दाराच्या खात्यात दीड कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले होते असा युक्तीवाद राजपाल यादव यांच्या वकीलाने केला आहे.

18 मार्चपर्यंत जामीन

बॉलिवूडमधील कॉमेडी अभिनेता राजपाल यादव गेल्या काही दिवसांपासून चेक बाऊंस प्रकरणात तो तिहार जेलमध्ये आहे. त्याला अटक होताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला होता. सलमान खान, अजय देवगण आणि सोनू सूद यांसारख्या स्टार्सनी त्याच्या मदतीसाठी फंड गोळा केले. आता राजपाल यादवला दिल्ली कोर्टातून मोठा दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. 18 मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सध्या राजपाल यादव 9 कोटी रुपयांच्या लोनशी संबंधित चेक बाऊन्स केसमध्ये 5 फेब्रुवारी 2026 पासून तिहार जेलमध्ये आहे. त्याने सरेंडर केल्यानंतरच जेलमध्ये पाठवले गेले. त्याच्या जामीनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळेपर्यंत इंडस्ट्रीतील लोक त्याच्या पाठीमागे उभे असल्याचे दिसले. सोशल मीडियावर लोक खुलेआम त्याला सपोर्ट करताना दिसले आहेत. आता राजपाल यादवला जामीन मंजुर झाल्याचे समोर आले आहे.

कर्ज कसे वाढले?

2012 साली राजपाल यादवने स्वतः दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘अता पता लापता’ साठी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर व्याज आणि इतर कारणांमुळे ही रक्कम 9 कोटींपर्यंत पोहोचली. कर्ज फेडण्याची तजवीज न झाल्याने कोर्टाने त्याला सरेंडर करण्याचा आदेश दिला होता. सरेंडर झाल्यानंतर राजपाल यादवला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते. आता त्याला जामीन मंजूर झाल्याचे समोर आले आहे.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....