Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार, नवा वकील नेमण्याची अंनिसची मागणी

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या खटल्यातून सरकारी वकिलांनी माघार घेतली. Indorikar Maharaj Statement case

Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार, नवा वकील नेमण्याची अंनिसची मागणी
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 5:36 PM

अहमदनगर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी वकीलपत्र मागे घेतल्याने आज होणारी सुनावणी पुढे ‌ढकलण्यात आलीय. आता 2 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. (Indorikar Maharaj Statement case hearing postponed till 2 December)

कीर्तनातून पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्या प्रकरणी इंदोरीकरांवर संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील इंदुरीकरांच्या वकिलांशी सरकारी वकिलांचा भावाच्या खटल्यानिमित्त संबंध येत असल्याचा आरोप झाल्याने सरकारी वकील कोल्हे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

नवीन सरकारी वकिलांची नेमणूक करावी, अंनिसची मागणी

सरकारी वकील कोल्हे यांनी माघार घेतल्याने नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या अ‌ॅड.‌ रंजना गवांदे  (Adv. Ranjana Gavande ) यांनी केलीय. या खटल्याची सुनावणी आज (बुधवार ता.25) होती. मात्र, सरकारी वकीलांनी खटल्यातून माघार घेतल्याने या‌ प्रकरणाची सुनावणी आता 2 डिसेंबर रोजी होणार आहे. (Indorikar Maharaj Statement case hearing postponed till 2 December)

काय आहे प्रकरण?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

इंदोरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती

इंदोरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा करुन या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावले असून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे.

फेब्रुवारी महिन्यात हा वाद समोर आल्यानंतर वारकरी तसेच इंदोरीकर समर्थकांनी ‘अकोले बंद’ची हाक देत आंदोलन केले होते. कोर्टात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे नेते अभिजीत पानसे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजप अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी इंदोरीकर यांची भेट देत समर्थन दिले होते. तर अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांनी देखील तहसीलदारांना निवेदन दिले होते. (Indorikar Maharaj Statement case hearing postponed till 2 December)

संबंधित बातम्या :

Indorikar Maharaj | मुला-मुलीच्या जन्माबाबत इंदोरीकर महाराजांचे वक्तव्य, संगमनेर कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

‘मी असं बोललोच नाही’, तृप्ती देसाईंच्या कायदेशीर नोटीसला इंदोरीकर महाराजांचं उत्तर

(Indorikar Maharaj Statement case hearing postponed till 2 December)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.