AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR : “बरेच प्रश्न आहेत, पण आता…”, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप

आयपीएल 2024 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. जर तरच्या गणितातूनही मुंबई इंडियन्स बाहेर पडलं आहे. कारण टॉपला असलेल्या चार संघांचे सध्या 12 गुण आणि त्यावर आहेत. त्यामुळे मुंबईने उर्वरित तीन सामने जिंकले तरी नेट रनरेट गाठणं कठीण आहे.

MI vs KKR : बरेच प्रश्न आहेत, पण आता..., मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 04, 2024 | 12:40 AM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत. एखादा मोठा चमत्कार घडला तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. पण हे सर्व मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना दिलासा देण्यासाठी बरं आहे. पण आता हे गणित काही शक्य नाही. त्यामुळे उर्वरित तीन सामने हे फक्त औपचारीक असणार आहेत. कारण हे तिन्ही सामने जिंकले तरी 12 गुण होतील आणि नेट रनरेट गाठणं कठीण आहे. मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पांड्याच्या हाती सोपवूनही काही खास करता आलं नाही, असा सूर क्रीडाप्रेमींचा आहे. गुजरात टायटन्सला दोनवेळा अंतिम फेरीत पोहोचवणार हार्दिक पांड्या मात्र फेल ठरला. मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्स तसं काही खास करू शकली नाही. आयपीएल 2023 मध्ये काठावर प्लेऑफमध्ये पोहोचली होती. त्यानंतर मुंबईचं आव्हान तिथेच संपुष्टात आलं. आता तर आठव्या नवव्या स्थानावर मुंबईची मजल राहिली आहे. कोलकात्याने पराभूत केल्याने हार्दिक पांड्या नाराज दिसला. त्याने सामन्यानंतर थोडक्यात पण बरंत काही बोलून गेला.

“खूप काही नाही. आता खूप सारे प्रश्न आहेत पण या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी काही काळ लागेल. आता फार काही बोलायचं नाही.”, अशा शब्दात हार्दिक पांड्याने नाराजी व्यक्त केली. खरं तर या सामन्यात हार्दिक पांड्याही काही खास करू शकला नाही. 3 चेंडूचा सामना करून 1 धाव केली आणि बाद झाला.मोक्याच्या क्षणी विकेट गमवल्याने मुंबईवरील दडपण वाढलं. त्यातून बाहेर पडणं कठीण झालं. एकदम कमी धावा असलेला सामना मुंबईने वानखेडे सारख्या मैदानात गमावला. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील आठवा पराभव आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.