‘कलंक’ फ्लॉप झाल्याने करण जोहर दिग्दर्शकावर नाराज?

मुंबई :  दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा ‘कलंक’ गेल्या 17 एप्रिलला प्रदर्शित झाला. मात्र, हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा भंग करणारा ठरला. प्रदर्शनापूर्वी ज्याप्रकारे या सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं, त्यावरुन हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल, असं वाटत होतं. मात्र, हा सिनेमा बॉक्सऑफिसवर आपटला. इतकी मोठी आणि प्रसिद्ध स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत आणण्यात अपयशी […]

‘कलंक’ फ्लॉप झाल्याने करण जोहर दिग्दर्शकावर नाराज?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई :  दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा ‘कलंक’ गेल्या 17 एप्रिलला प्रदर्शित झाला. मात्र, हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा भंग करणारा ठरला. प्रदर्शनापूर्वी ज्याप्रकारे या सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं, त्यावरुन हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल, असं वाटत होतं. मात्र, हा सिनेमा बॉक्सऑफिसवर आपटला. इतकी मोठी आणि प्रसिद्ध स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत आणण्यात अपयशी ठरला. ‘कलंक’ हा सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे हा सिनेमा फ्लॉप ठरल्याने सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक वर्मन आणि करण जोहर यांच्यातील नात्यांमध्ये कटुता निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं.

अभिषेक वर्मन यांच्या खराब दिग्दर्शनामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला, यामुळे करण जोहर हे अभिषेक वर्मनवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आमच्यात कुठल्याही प्रकारची नाराजी नसून, ही केवळ अफवा असल्याचं करणने स्पष्ट केलं. ‘कलंक’ला प्रेक्षकांनी तुटपुंजा प्रतिसाद दिला. त्यामुळे अभिषेक वर्मन हे नाराज होते. त्यावर करण जोहरने नाराज होण्याचं कारण नाही असं म्हणत अभिषेक वर्मन यांना धीर दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनुसार, “अभिषेक वर्मन यांनी ‘कलंक’ सिनेमापूर्वी ‘2 स्टेट्स’ हा यशस्वी सिनेमा बनवला आहे. त्यामुळे ‘कलंक’ जरी फ्लॉप ठरला असला, तरी त्यांचा ग्राफ संतुलित आहे. त्यामुळे त्यांना काळजी करण्याची गरज नाही”, असं करणने म्हटलं. तसेच, त्यांनी आता नव्या स्क्रिप्टवर काम करावं असा सल्लाही करणने अभिषेक वर्मन यांना दिला.

‘कलंक’ हा सिनेमा एक मल्टीस्टारर सिनेमा आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, माधूरी दिक्षित, सोनाक्षी सिन्हा, अभिनेता वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि कुणाल खेमू यांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमात 20 वर्षांनंतर माधूरी दिक्षित आणि संजय दत्त यांची जोडी पाहायला मिळाली. या सिनेमाचं बजेट 150 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ‘कलंक’ हा सिनेमा करण जोहरचा ड्रीम प्रोजोक्ट होता. 15 वर्षांपूर्वी त्याचे पिता दिग्दर्शक यश जोहर यांनी हा सिनेमा बनवण्याचं स्वप्न बघितलं होतं.

संबंधित बातम्या :

पहिल्याच दिवशी कलंक चित्रपटाची कमाई तब्बल…

माधुरी-आलियाच्या दिलखेच अदा, ‘कलंक’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज

खतरनाक ‘कलंक’, वरुणच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.