जाणीवपूर्वक जातीचा तेढ निर्माण करण्याचं काम सुरू
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्यासाठी आक्रमक झालेल्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकदेखील आक्रमक झाले आहेत. यामुळे मुंबईत (Mumbai Security) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्यासाठी आक्रमक झालेल्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकदेखील आक्रमक झाले आहेत. यामुळे मुंबईत (Mumbai Security) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant atil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिक सध्या आक्रमक दिसत असले तरीही पूर्वीपेक्षा ते बरेच मवाळ झाले आहेत. त्यांनी बराच संयम दाखवला आहे. एखाद्याच्या घरापर्यंत पोहोचत असाल तर अशी प्रतिक्रिया व्यक्त होणे साहजिक आहे, असं वक्तव्य यंत पाटील यांनी केलं आहे. तसेच कुणी जर जाणीवपूर्वक धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर सगळ्यांचे पत्ते आम्हाला माहिती आहेत, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
Latest Videos
Latest News