AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : राहुल गांधींनी मर्डर केला…संसदेत एकच गोंधळ, भाजपा नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ!

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानेच सुरक्षा जवान काम करतात, असा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनीदेखील हस्तक्षेप करत पुरावे असल्याशिवाय कोणतेही आरोप करू नये. विरोधी पक्षनेते असल्याने तुमचे प्रत्येक मत रेकॉर्डवर जात आहे, असे राहुल गांधी यांना सांगितले.

Rahul Gandhi : राहुल गांधींनी मर्डर केला...संसदेत एकच गोंधळ, भाजपा नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ!
rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 4:43 PM
Share

Rahul Gandhi Vs Kiren Rijiju : यंदाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या आंदोलनात पोलीस तसेच सुरक्षा जवानांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार, पॅलेट गनचा मारा केल्याने विरोधक चांगलेच संतापले आहेत. आज (29 जुलै) याच लाठीमारावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे नाव घेत गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांच्या त्या विधानावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप व्यक्त केला. त्यामुळेच संसदेत काही वेळासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला. याच गोंधळादरम्यान, भाजपाचे नेते तथा मंत्री किरेन रिजिजू यांनी केलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे.

लोकसभेत नेमकं काय घडलं?

लोकसभेचे कामकाज चालू झाल्यानंतर दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन तसेच 20 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जच्या मुद्द्यावर वादळी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या आदेशानंतरच विद्यार्थ्यांविरधात बळाचा वापर करण्यात आला, विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला, असं गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. गृहमंत्री अमित शाहा यांनीच विद्यार्थ्यांवर फायरिंगचा आदेश दिला, असेही राहुल गांधी म्हणाले. यावरच किरेन रिजिजी यांनी आक्षेप नोंदवला.

राहुल गांधी यांनी खून केला आहे…

कोणताही ठोस आधार नसताना अशा प्रकारचे विधान करणे योग्य नाही, असे किरेन रिजिजून म्हणाले. तसेच “कोणताही पुरावा नसताना असे आरोप केले जात असतील तर मीदेखील अनेक दावे करू शकतो. राहुल गांधी यांनी खून केला आहे, असंही मी म्हणू शकतो,” असं विधान रिजिजू यांनी केले. अमित शाहा यांनी तसा आदेश दिल्याचे एखादे पत्र राहुल गांधी यांनी सादर करावे, अशी मागणीही रिजिजू यांनी केली.

लोकसभा अध्यक्षांनी सांगितला नियम

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानेच सुरक्षा जवान काम करतात, असा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनीदेखील हस्तक्षेप करत पुरावे असल्याशिवाय कोणतेही आरोप करू नये. विरोधी पक्षनेते असल्याने तुमचे प्रत्येक मत रेकॉर्डवर जात आहे, असे राहुल गांधी यांना सांगितले. दरम्यान, या सर्व आरोप-प्रत्यारोपादरम्यान विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधक जवाब दो…गृहमंत्री जवाब दो..अशी घोषणाबाजी करत होते. दरम्यान, आता लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकात पेपरफुटीविरोधात मोठ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना फायदा
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी,
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं