AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारला घाम फुटणार; CJP मोठ्या आंदोलनाच्या तयारीत? नवा प्लॅन काय?

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं मोठं आंदोलन उभा केलं होतं, या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार सीजेपीकडून देशात नवं आंदोलन उभारलं जाण्याची शक्यात आहे.

सरकारला घाम फुटणार; CJP मोठ्या आंदोलनाच्या तयारीत? नवा प्लॅन काय?
CJP agitationImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 29, 2026 | 3:03 PM
Share

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर तब्बल एक महिना आंदोलन करण्यात आलं, संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, दरम्यान आता या आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टी मोठा प्लॅन करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली असून, सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु एकीकडे शेतकरी नेत्यांकडून अमेरिका आणि भारत ट्रेड डिल विरोधात मोठं आंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे ही बातमी समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, त्यामुळे या भेटीचं महत्त्व वाढलं आहे.

इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार या बैठकीमध्ये सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासोबतच काही नेते देखील सहभागी झाले होते. भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडली. या बैठकीबाबत बोलताना सीजेपीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली, या निमित्ताने किसान यूनियन आणि सीजेपीला एका मंचावर आणण्याचा आमचा उद्देश होता, असं सीजेपीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीबाबत बोलताना रांका यांनी असं म्हटलं आहे की, आम्हाला अशी आशा आहे की, शेतकरी आणि देशातील तरुण मोदींना चहुबाजुंनी घेरण्याचं काम करतील.

शंभू बॉर्डरवर जाण्याचा प्लॅन

भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी ट्रेड डील होणार आहे, या व्यापारी कराराला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये ‘किसान महापंचायत’चं’आयोजन करण्यात आलं होतं. या महापंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो शेतकरी दिल्लीकडे निघाले होते, परंतु हरियाणा पोलिसांनी या शेतकऱ्यांना बॉर्डवरच अडवलं, परंतु आम्ही आता लवकरच नवी रणनीती तयार करू अशी प्रतिक्रिया आंदोलक शेतकऱ्यांनी त्यावेळी दिली होती. दरम्यान भारतीय किसान युनियनच्या वतीने भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलला विरोध करण्यासाठी मोठं आंदोलन उभारलं जाण्याची शक्यता आहे, या आंदोलनात सीजेपी देखील सहभागी होणार का? हे अजून स्पष्ट नाही, मात्र सीजेपीच्या नेत्यांनी टिकैत यांची भेट घेतल्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार