दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी जिगर लागते : चुलत्या

| Updated on: Jan 24, 2020 | 10:58 AM

तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात चुलत्या या पात्राची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता कैलास वाघमारेचा (Kailash Waghmare Tanhaji The Unsung Warrior) जंगी सत्कार करण्यात आला.

दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी जिगर लागते : चुलत्या
Follow us on

जालना : तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात चुलत्या या पात्राची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता कैलास वाघमारेचा (Kailash Waghmare Tanhaji The Unsung Warrior) जंगी सत्कार करण्यात आला. स्वत:च्या जालना जिल्ह्यात झालेल्या या सत्काराने कैलास वाघमारे (Kailash Waghmare Tanhaji The Unsung Warrior) भारावून गेला. सोशल मीडियाच्या जमान्यात स्वत:साठी लाईक मिळवण्याची धडपड चालू आहे, मात्र दुसऱ्याला लाईक करणं किंवा दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी जिगर लागते, असं यावेळी कैलास म्हणाला.

मूळ जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरे हे कैलास ठोंबरेचं छोटंसं गाव. त्याने तान्हाजी सिनेमात चुलत्या या पात्राची भूमिका साकारुन, आपला ठसा उमटवला. त्यामुळेच जेबी स्टुडिओ वर्गमित्रांनी मिळून कैलास वाघमारेचा सत्कार केला.

यावेळी कैलास म्हणाला, “मैत्री करणे सोपं असते, मात्र ती निभावणं खूप अवघड असतं. आज फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, टिकटॉक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या जमान्यात,  माणूस स्वत:ची सेल्फी घेऊन, स्वत:चं कौतुक करण्यात मश्गूल झाला आहे. प्रत्येकाला वाटतं मला लाईक्स मिळाव्या, माझं कौतुक व्हावं, मला लोकांनी चांगल्या कमेंट कराव्या. माझ्या पोस्ट शेअर व्हाव्या, असं स्वत:चं कौतुक होण्यासाठी लोक धडपडत आहेत. पण अशा गदारोळामध्ये कुणाला तरी दुसऱ्याचं कौतुक करावंसं वाटतं, हे दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी जिगर लागते, ते माझ्या मित्रांमध्ये आहे”

तान्हाजीची बॉक्स ऑफिसवर घोडदौड

दरम्यान, तान्हाजी या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. या सिनेमाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अभिनेता अजय देवगणचा हा शंभरावा सिनेमा आहे. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

महाराष्ट्रातही टॅक्स फ्री

उत्तर प्रदेश आणि हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला आहे. ‘तान्हाजी’ करमुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Tanhaji Movie Tax free) निर्णय झाला. चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर तेराव्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या   

शेतकरी घरातील कैलास वाघमारेचा ‘तान्हाजी’तील चुलत्यापर्यंतचा प्रवास

‘तान्हाजी’ टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांचा निर्णय, मंत्रिमंडळासोबत चित्रपट पाहणार   

‘तान्हाजी’ चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाशी सहमत नाही : सैफ अली खान