किरण रावला आई होण्यासाठी करावा लागला खूप संघर्ष, अनेकवेळा झाला गर्भपात

आमीर खानची दुसरी पत्नी किरण राव हिने तिला आई होण्यासाठी किती संघर्ष करावा लागला याबाबत नुकताच खुलासा केला आहे. प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा असते. तशी किरण रावला देखील होती. पण सतत गर्भपात झाल्याने तिला अनेक वेदना सहन कराव्या लागल्याचं तिने म्हटले आहे.

किरण रावला आई होण्यासाठी करावा लागला खूप संघर्ष, अनेकवेळा झाला गर्भपात
Kiran rao
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 9:33 PM

मुंबई : आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव वेगळे होऊन बराच काळ लोटला आहे. किरण राव तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबाबतही चर्चेत असते. नुकताच ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेत वाहवा मिळवलेल्या किरणने एक मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, मुलगा आझाद खानच्या जन्मापूर्वी तिला अनेकवेळा गर्भपाताच्या वेदना सहन कराव्या लागल्या आहेत.

आई होण्यासाठी केला संघर्ष

किरण रावला आई होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा असते. सुपरस्टार आमिर खानसोबत लग्नानंतर किरण रावनेही हे स्वप्न पाहिले होते. मात्र यासाठी तिला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. अलीकडेच झूमला दिलेल्या मुलाखतीत किरण रावने आई होण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला हे सांगितले आहे.

डायरेक्टर किरण राव म्हणाली की, आम्ही धोबीघाट चित्रपटाची तयारी करत होतो, तेव्हा मुलगा आझाद खानचा जन्म झाला. आम्ही सरोगसीची मदत घेतली, त्यामुळे आमिर आणि मी पालक होऊ शकलो. याचे मुख्य कारण म्हणजे माझे अनेक गर्भपात झाले होते आणि मी पुन्हा पुन्हा गर्भधारणा करू शकत नव्हते.

आरोग्यावर मोठा परिणाम

माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा खूप परिणाम झाला. मी 5 वर्षे खूप वेदना सहन केल्या आणि खूप अडचणींनंतर मला आई होण्याचा आनंद मिळाला मग तो सरोगसीच्या मदतीने का होईना.

2011 मध्ये किरण राव आणि आमिर खान यांचा मुलगा आझाद खानचा जन्म झाला. घटस्फोटानंतरही आमिर अनेकदा त्याच्या मुलासोबत स्पॉट झाला आहे. एवढेच नाही तर आमिरची मोठी मुलगी आयरा खानच्या लग्नात किरण आणि आझाद दिसले होते.

अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये.
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्...
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्....
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत..
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच....
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?.
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर.