AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

21व्या वर्षी साखर कारखान्याचं अध्यक्षपद, उत्कृष्ट संसदपटू; शंभूराज देसाईंविषयी हे माहीत आहे का?

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भररस्त्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मुजरा केल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. (know about shiv sena leader shambhuraj desai)

21व्या वर्षी साखर कारखान्याचं अध्यक्षपद, उत्कृष्ट संसदपटू; शंभूराज देसाईंविषयी हे माहीत आहे का?
shambhuraj desai
| Updated on: Mar 16, 2021 | 6:53 PM
Share

मुंबई: गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भररस्त्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मुजरा केल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे शंभूराज देसाई चांगलेच चर्चेत आले आहेत. शांत आणि संयमी राजकारणी म्हणून देसाई प्रसिद्ध आहेत. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी साखर कारखान्याचं अध्यक्षपद भूषविलेल्या शंभूराज देसाई यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला आढावा. (know about shiv sena leader shambhuraj desai)

कौटुंबीक पार्श्वभूमी

मूळचे सातारचे असलेल्या शंभूराज देसाई यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1966 रोजी मुंबईत झाला. बीकॉमपर्यंत त्यांचं शिक्षण जालं आहे. पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. देसाई यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

21व्या वर्षी महत्त्वाची जबाबदारी

शंभूराज देसाई यांच्यावर अत्यंत कमी वयात मोठी जबाबदारी आली होती. त्यांचे वडील शिवाजीराव देसाई यांचं निधन झाल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी शंभूराज यांच्यावर बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा आली. आशिया खंडात सहकार क्षेत्रातील सर्वात कमी वयाचे चेअरमन म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. तेव्हापासून देसाई हे सहकार, समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.

सामाजिक कार्य

देसाई यांच्या सामाजिक कार्याला 1986पासूनच सुरुवात झाली होती. साताऱ्यात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. वैद्यकीय शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन असो की ग्रामीण डोंगराळ भागात वैद्यकीय सेवा कार्य सुरू करण्याचं काम असो, प्रत्येक काम त्यांनी अत्यंत चिकाटीने पार पाडलं. दौलतनगर, मरळी, तालुका पाटण या संस्थेतर्फे पॉलिटेनिक कॉलेज, ज्युनिअर व सीनिअर कॉलेज, इंग्लिश मीडिअम स्कूलही त्यांनी सुरू केले.

संस्थांवर कार्यरत

दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरणा शिक्षण संस्था मर्यादित संस्थेचे ते विश्वस्त होते. शिवदौलत सहाकरी बँकेचे संस्थापक, नॅशनल फेडरेशन ऑफ शुगर फॅक्टरी, नवी दिल्लीचे सदस्य, बँक ऑफ महाराष्ट्राचे केंद्रीय प्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

शिवसेनेतून राजकीय प्रवास

पाटण तालुक्यात व सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे संघटनात्मक कार्य करत असतानाच 1995-99 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या काळात सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1992-1997मध्ये पंचायत समिती पाटणचे ते सदस्य होते. 1992-2002मध्ये जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. (know about shiv sena leader shambhuraj desai)

विधानसभेत पोहोचले

सामाजिक कार्य करत असतानाच जिल्हा परिषदेच्या राजकारणात देसाई यांनी दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर त्यांना 2004मध्ये शिवसेनेने पाटणमधून पहिल्यांदा विधासभेचं तिकीट दिलं. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. 2009मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकर यांचा प्रचंड मतांनी पराभव केला. 2014 आणि 2019मध्येही पाटणच्या मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून देत विधानसभेत पाठवलं. या काळात त्यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही गौरवण्यात आलं. 2014मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये देसाई यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यावेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार येताच देसाई यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. (know about shiv sena leader shambhuraj desai)

संबंधित बातम्या:

…अन् भररस्त्यात शंभुराज देसाईंनी उदयनराजेंना केला मुजरा

साताऱ्यातील राजकीय घडामोडी थांबेनात, उदयनराजे थेट शिवेंद्रराजेंच्या घरी

मोठी बातमी: उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

(know about shiv sena leader shambhuraj desai)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...