Udayanraje meet Shivendraraje : साताऱ्यातील राजकीय घडामोडी थांबेनात, उदयनराजे थेट शिवेंद्रराजेंच्या घरी

Udayanraje meet Shivendraraje : साताऱ्यातील राजकीय घडामोडी थांबेनात, उदयनराजे थेट शिवेंद्रराजेंच्या घरी
उदयनराजे-शिवेंद्रराजे भेट

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje) यांनी आमदार शिवेंद्रराजे (Shivendraraje) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. | Udayanraje meet Shivendraraje

Akshay Adhav

| Edited By: चेतन पाटील

Feb 22, 2021 | 3:40 PM

सातारा : साताऱ्यातील राजकीय घडामोडी काही केल्या थांबण्याचं नाव घेईनात. आज अचानकपणे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje) यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Udyanraje Bhosale meet Shivendraraje Bhosale )

खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्याने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आलाय. परंतु उदयनराजेंच्या एका नातेवाईकाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते स्वत: शिवेंद्रराजेंना भेटल्याची माहिती आहे.

उदयनराजे यांचे मामा नाशिकमध्ये असतात. त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी म्हणजेच उदयनराजेंच्या मामे भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी उदयनराजे हे शिवेंद्रराजे यांच्या सुरुची (Suruchi Bunglow) या निवासस्थानी गेले होते. या दरम्यान दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसून केवळ आमंत्रण देऊनच उदयनराजे तिथून निघाले असल्याची माहिती आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं वारं

राज्यातील अग्रणी जिल्हा बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा बँकेची निवडणूक जवळ आलीय. बँकेच्या निवडणुकीवरुन राजकीय घडामोडींना वेग आलाय. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सध्या भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. त्यांच्या विचाराचे 5 संचालक देखील बँकेत आहेत. त्यामुळे साताऱ्याच्या जिल्हा बँकेची निवडणूक महाविकासआघाडी म्हणून की पक्षविरहीत लढवली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांनी जिल्हा बँक निवडणुकीचा दाखला देत शशिकांत शिदेंवर निशाणा साधला होता. तर दुसरीकडे शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा देखील होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली तेव्हा देखील जिल्हा बँक निवडणुकीचा विषय चर्चेत आला होता.

उदयनराजे भोसले-शंभूराज देसाई भेट

एकीकडे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असताना, साताऱ्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. त्यानंतर शिवजयंतदिनी उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खलबते रंगली.

उदयनराजेंच्या भेटीगाठी 

उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या.

शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 14 सप्टेंबर 2019 रोजी उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवलं.  त्यामुळे मूळचे राष्ट्रवादीचे असलेले दोन्ही राजे सध्या भाजपमध्ये आहेत.

(Udyanraje Bhosale meet Shivendraraje Bhosale)

हे ही वाचा :

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह, पवार-फडणवीसांसह पाहुण्यांची गर्दी, पुण्यातील मंगल कार्यालयाला नोटीस

आधी शिवेंद्रराजे भोसले-शशिकांत शिंदेंची जवळीक, आता उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें