शशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’?

विशेष म्हणजे शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना एक ऑफरही दिली होती (Shivendraraje Bhosle may return NCP )

शशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे 'राष्ट्रवादी पुन्हा'?
शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शशिकांत शिंदे

सातारा : “शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहित नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं” असं सूचक वक्तव्य सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी केलं. त्यामुळे शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत घरवापसी करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. शिवेंद्रसिंहराजे आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक घडत आहे. मात्र शिवेंद्रराजेंनी दिलजमाईचे संकेत देत राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत दिले आहेत का, असा सवाल विचारला जात आहे. (Shivendraraje Bhosle may return to NCP hinting at reuniting with Shashikant Shinde)

जावळीतील कार्यक्रमाला शिवेंद्रराजेंची उपस्थिती

जावळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार होते. पण शिवेंद्रराजे वगळता इतरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

शिवेंद्रसिंहराजे यांनी काही दिवसांपूर्वी जावळीतीलच एका कार्यक्रमात शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण त्यावर शशिकांत शिंदे यांनी मी सर्व पक्षवाढीसाठी करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज अचानक शिवेंद्रराजे यांनी आपण दोघे एकच आहोत, असे सूचक वक्तव्य करुन राजकीय धुरळा उडवून दिला आहे. यामागे शिवेंद्रसिंहराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी (17 फेब्रुवारी) झालेली भेट असण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील: शशिकांत शिंदे

विशेष म्हणजे शशिकांत शिंदे यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं शिवेंद्रराजे भोसलेंना एक ऑफरही दिली होती. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील, अशी ऑफर शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंना दिली होती. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदेंचा वाद शिगेला

भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्यातील वादाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमात, ‘मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे. समोरच्याची वाट लागल्याशिवाय गप्प बसत नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शशिकांत शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनीही शिवेंद्रराजे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर शिवेंद्रसिंह राजे यांनी शशिकांत शिंदे आणि शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहीत नाही, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

शिवेंद्रराजे कोण आहेत ?

शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. (Shivendraraje Bhosle may return to NCP hinting at reuniting with Shashikant Shinde)

शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे चुलतबंधू. मात्र गेल्या काही काळात दोघांमध्येही विस्तव जात नव्हता. आधी दोघंही राष्ट्रवादीत होते, नंतर दोघंही भाजपात गेले. भाजपप्रवेशाच्या वेळी दोन्ही राजेंचं मनोमीलन झाल्याचं पाहायला मिळालं.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे राष्ट्रवादीच्या तिकीटावर सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. दोन वेळा जावळी, तर दोन वेळा कोरेगाव मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. सध्या ते विधानपरिषदेवर आमदार आहेत.

संबंधित बातम्या :

शिवेंद्रराजे भोसलेंना राष्ट्रवादीची मोठी ऑफर; शशिकांत शिंदे म्हणतात…

मी उदयनराजेंविरोधात निवडून आलेला माणूस, समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही : शिवेंद्रराजे

‘शशिकांत शिंदे आणि मी एकच’, जावळीच्या सरपंच परिषदेत शिवेंद्रसिंहराजेंची पुन्हा फटकेबाजी

 अहो आश्चर्यम… लग्नकार्यात शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदे एकमेकांच्या शेजारी बसतात तेव्हा…

(Shivendraraje Bhosle may return to NCP hinting at reuniting with Shashikant Shinde)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI