AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी उदयनराजेंविरोधात निवडून आलेला माणूस, समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही : शिवेंद्रराजे

माझी वाट लागली तरी चालेल, पण समोरच्याची मी वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही" असा सज्जड दम शिवेंद्रराजेंनी भरला. (Shivendraraje Shashikant Shinde Udayanraje)

मी उदयनराजेंविरोधात निवडून आलेला माणूस, समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही : शिवेंद्रराजे
| Updated on: Feb 04, 2021 | 8:55 AM
Share

सातारा : साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. “मी उदयनराजेंविरोधात विधानसभा निवडणूक लढवून आलेला माणूस आहे, समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही” असं म्हणत शिवेंद्रराजे बरसले. भाजपचे राज्यसभा खासदार आणि चुलतबंधू उदयनराजे यांचा उल्लेख करत शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना दिलेल्या अप्रत्यक्ष इशाऱ्याची सर्वत्र चर्चा आहे. (Shivendraraje Bhosle slams Shashikant Shinde referring Udayanraje)

साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा शांत आणि संयमी स्वभाव सर्वांना परिचित आहे. मात्र जावळी तालुक्यातील कुडाळ गावातील एका कार्यक्रमात त्याचा अनोखा अवतार पाहायला मिळाला. “मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे, हे विसरु नका. माझी वाट लागली तरी चालेल, पण समोरच्याची मी वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही” असा सज्जड दम शिवेंद्रराजेंनी भरला.

काय म्हणाले शिवेंद्रराजे?

“मग.. माझी वाट लागली तरी चालेल, याला संपवायचं ना.. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार, ही आमची भूमिका आहे. काट्याने काटा काढायचा, मी पण मग मागे फिरणारा नाही. मी पण कुणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे.” असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला.

छत्रपतींचं घराणं आहे, आपली भांडणं, मारामाऱ्या… नाव खराब व्हायला नको. मग आम्हीपण एकत्र आलो. आम्ही एकत्र आलेलो काही जणांना बघवत नाही, माझ्या कानात काहीतरी सांग, त्यांच्या कानात काहीतरी सांग, असा टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला.

शिवेंद्रराजे कोण आहेत ?

शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. (Shivendraraje Bhosle slams Shashikant Shinde referring Udayanraje)

शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे चुलतबंधू. मात्र गेल्या काही काळात दोघांमध्येही विस्तव जात नव्हता. आधी दोघंही राष्ट्रवादीत होते, नंतर दोघंही भाजपात गेले. भाजपप्रवेशाच्या वेळी दोन्ही राजेंचं मनोमीलन झाल्याचं पाहायला मिळालं.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे राष्ट्रवादीच्या तिकीटावर सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. दोन वेळा जावळी, तर दोन वेळा कोरेगाव मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. सध्या ते विधानपरिषदेवर आमदार आहेत.

संबंधित बातम्या :

साताऱ्यात दोन ‘राजें’चं मनोमीलन, भाजपप्रवेशानंतर उदयनराजेंची शिवेंद्रराजेंशी चर्चा

उदयनराजे थोरले बंधू, विधानसभेला मला मदत करणार : शिवेंद्रराजे

(Shivendraraje Bhosle slams Shashikant Shinde referring Udayanraje)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.