AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह, पवार-फडणवीसांसह पाहुण्यांची गर्दी, पुण्यातील मंगल कार्यालयाला नोटीस

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला (Dhananjay Mahadik son wedding notice)

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह, पवार-फडणवीसांसह पाहुण्यांची गर्दी, पुण्यातील मंगल कार्यालयाला नोटीस
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाह सोहळा
| Updated on: Feb 22, 2021 | 1:30 PM
Share

पुणे : कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या मुलाचा शाही लग्न सोहळ्याची चौकशी होणार आहे. पुण्यात रविवारी झालेल्या लग्न सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह विविध मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. (BJP Leader Dhananjay Mahadik son wedding Marriage Hall gets notice)

मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला होता. याबाबत मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस देऊन चौकशी केली जाणार आहे. कोरोनासंबंधी नवे नियम आजपासून (सोमवार 22 फेब्रुवारी) लागू होणार असले तरी आधीच्या नियमावलीनुसार शंभर जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे बंधन होते.

आले वऱ्हाडी कोण कोण?

धनंजय महाडिक यांचे पुत्र पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी यांच्या लग्नाला शंभरपेक्षा अधिक पाहुणे उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अशा दिग्गजांनी हजेरी लावली होती. अनेक पाहुण्यांनी लग्नात मास्क नव्हते घातले. परंतु केवळ मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस बजावली जाणार असून महाडिक किंवा अन्य कोणावर कारवाईचा अद्याप उल्लेख नाही.

कोण आहेत धनंजय महाडिक?

धनंजय महाडिक यांनी 2004 मध्ये कोल्हापूरमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून महाडिकांचा पराभव झाला होता. त्यानंतर शिवसेनेला अलविदा करत महाडिक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. (BJP Leader Dhananjay Mahadik son wedding Marriage Hall gets notice)

महाडिक यांना 2014 मध्ये राष्ट्रवादीने तिकीट दिले आणि त्यांनी लोकसभा गाठली. परंतु 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय सदाशिवराव मंडलिक यांनी महाडिकांना त्यांच्याच मतदारसंघात धूळ चारली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात धनंजय महाडिक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यावेळी धनंजय महाडिक यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं सामाजिक भान, कोरोनामुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित

(BJP Leader Dhananjay Mahadik son wedding Marriage Hall gets notice)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.