AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. | Chhagan Bhujbal tested Corona Positive

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी
छगन भुजबळ
| Updated on: Feb 22, 2021 | 10:36 AM
Share

नाशिक : राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण झालीये. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट करुन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. (Minister Chhagan Bhujbal tested Corona Positive)

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन भुजबळ यांनी केली. तसंच माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून आणखी 24 तासही उलटत नाहीयत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नात विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. भुजबळांबरोबर शरद पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार दिलीप बनकर तसंच राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी लग्नसोहळ्याला उपस्थित होते. आता छगन भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्यांचीच धाकधुक वाढली आहे.

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांना कोरोना

शिवजयंतीदिनी (19 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खान्देशातील राष्ट्रवादीचे बडे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

याआधीदेखील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची बाधा झाल्यास रुग्णाला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. या भीषण संकटाची जाणीव ठेवून राष्ट्रवादीने जनता दरबार पुढच्या दोन आठवड्यांसाठी स्थगित केला आहे.

कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील मंत्री

कॅबिनेट मंत्री

  1. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : एप्रिल 2020 – कोरोनामुक्त़
  2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 25 मे 2020 – कोरोनामुक्त
  3. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 12 जून 2020 – कोरोनामुक्त
  4. अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 20 जुलै 2020 – कोरोनामुक्त
  5. बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 15 ऑगस्ट 2020 – कोरोनामुक्त
  6. सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 3 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  7. नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  8. हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी) – 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  9. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री (शिवसेना) – 24 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  10. वर्षा गायकवाड – शिक्षणमंत्री (काँग्रेस) – 22 सप्टेंबर – कोरोनामुक्त
  11. अनिल परब – परिवहनमंत्री (शिवसेना) – 12 ऑक्टोबर – कोरोनामुक्त
  12. अजित पवार – उपमुख्यमंत्री, (राष्ट्रवादी ) – 26 ऑक्टोबर 2020 – कोरोनामुक्त
  13. दिलीप वळसे पाटील, कामगार मंत्री – कोरोनामुक्त
  14. जयंत पाटील – जलसंपदा मंत्री – 18 फेब्रुवारी 2021 – कोरोना संसर्ग
  15. राजेश टोपे – आरोग्य मंत्री – 18 फेब्रुवारी 2021 – कोरोना संसर्ग
  16. अनिल देशमुख – गृहमंत्री – 5 फेब्रुवारी 2021- कोरोनामुक्त
  17. राजेंद्र शिंगणे – अन्न आणि औषध प्रशासन मंत्री – 16 फेब्रुवारी 2021- कोरोना संसर्ग
  18. छगन भुजबळ- अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री- कोरोनाग्रस्त

राज्यमंत्री

  1. अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना) – कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 – कोरोनामुक्त
  2. संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 2020 – कोरोनामुक्त
  3. प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 7 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  4. विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 11 सप्टेंबर 2020- कोरोनामुक्त
  5.  बच्चू कडू – शालेय शिक्षण (अपक्ष) – कोरोनाची लागण : 19 सप्टेंबर 2020-कोरोनामुक्त
  6.  सतेज पाटील – गृहराज्यमंत्री – 9 फेब्रुवारी 2021- कोरोनामुक्त
  7. दत्तात्रय भरणे, जलसंपदा राज्यमंत्री

बच्चू कडू – शालेय शिक्षण राज्यमंत्री – 19 फेब्रुवारी 2021- दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग

ठाकरेंच्या अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण

महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. काहींना तर दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला. म्हणजेच 55 टक्के मंत्री कोरोनाच्या तावडीत सापडले. तर राज्यमंत्री आहेत 10 त्यांच्यापैकी 7 मंत्र्यांनी कोरोना झाला, म्हणजेच महाविकास आघाडीतील राज्यमंत्र्यांना कोरोना होण्याचं प्रमाण तब्बल 70 टक्के आहे. या दोघांची मिळून टक्केवारी काढली तर एकूण मंत्रिमंडळापैकी 50 टक्क्यांहून अधिक मंत्रिमंडळ कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचं दिसतं.

हे ही वाचा :

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.