राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती

नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांचा विवाह सोहळा नाशिक तालुक्यातील अलास्का बँक्वेट हॉलमध्ये आज पार पडला.

  • विठ्ठल भाडमुखे, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 11:54 AM, 21 Feb 2021
राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती
आमदार सरोज अहिरे विवाहबंधनात...

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आमदार सरोज अहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळा आज नाशिक येथे पार पडला. नाशिक तालुक्यातील अलास्का बँक्वेट हॉलमध्ये आज पार पडतोय. डॉक्टर प्रविण वाघ (Dr Pravin Wagh) यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या. (NCp MLA Saroj Ahire And Dr Pravin Wagh Wedding)

Saroj Ahire Wedding Ceremony

आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसोहळ्यातील एक क्षण…

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर यांनी उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिले.

विवाह सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे ,सर्वोसर्वा शरद पवार, ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुण्याची बैठक आटपून विवाहाला उपस्थित राहिले आहेत.

अतिशय मोजक्या मंडळींच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त मंडळींना आमंत्रण न देता आप्तेप्ट, घरातील मंडळी, मोजके नातेवाईक आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

नवरा मुलगा कोण?

चोरडिया चोपडा नगर येथे असलेल्या कल्पना आणि रामदास वाघ यांचे चिरंजीव डॉ. प्रवीण वाघ यांच्याशी सरोज अहिरे यांनी सप्तपदी घेतली. प्रवीण वाघ हे दाताचे डॉक्टर आहेत.

सरोज अहिरे 2019 साली आमदार

सरोज अहिरे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. मतदारसंघात जनतेशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या सुपरिचित आहेत.

(NCp MLA Saroj Ahire And Dr Pravin Wagh Wedding)

हे ही वाचा :

वेळेआधीच अजित पवार बैठकीला पोहोचले, अधिका-यांची पळापळ, आमदार-खासदारांचीही दमछाक

मोठी बातमी: चालकाने मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त; प्रशासनाचा मोठा निर्णय