कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित

राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढच्या दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित केला आहे (NCP cancels Janata Darbar for next two weeks).

चेतन पाटील

|

Feb 19, 2021 | 3:26 PM

मुंबई : राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढच्या दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित केला आहे. विशेष म्हणजे काल (19 फेब्रुवारी) दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामाध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खान्देशातील राष्ट्रवादीचे बडे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली (NCP cancels Janata Darbar for next two weeks).

याआधीदेखील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची बाधा झाल्यास रुग्णाला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. या भीषण संकटाची जाणीव ठेवून राष्ट्रवादीने जनता दरबार पुढच्या दोन आठवड्यांसाठी स्थगित केला आहे (NCP cancels Janata Darbar for next two weeks).

जनता दरबार का भरवला जातो?

सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी जनता दरबार हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राबविण्यात येतो. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे सर्व मंत्री या उपक्रमास आवर्जून उपस्थित असतात. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा जनता दरबार पुढच्या दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार जनता दरबार दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात येत असल्याचं ट्विटरवर सांगण्यात आलं आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन आणि गर्दी टाळावी, असंदेखील आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : मोठी बातमी : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण, दिवसभरात राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांना कोरोना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें