कोरोना महामारीमुळे गणेश मंडळांचे आर्थिक नकुसान, सामाजिक कार्यात आखडता हात

| Updated on: Aug 30, 2020 | 3:10 PM

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देणगी आणि भक्तांकडून मिळणारे दान या माध्यमातून मोठे उत्पन्न व्हायचे (Ganesh Mandal lost due to Corona).

कोरोना महामारीमुळे गणेश मंडळांचे आर्थिक नकुसान, सामाजिक कार्यात आखडता हात
Follow us on

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देणगी आणि भक्तांकडून मिळणारे दान या माध्यमातून मोठे उत्पन्न व्हायचे (Ganesh Mandal lost due to Corona). पण यंदा कोरोना महामारीमुळे यावेळी गणेश मंडळांच्या 70 ते 80 टक्के उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाला आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे समोर आलं आहे. शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्याशी निगडित असलेल्या मोफत शस्त्रक्रिया, डायलिसीस सेंटर आणि नैसर्गिक आपत्तीतील मदत या गरजूंना पुरविण्यात येणाऱ्या सेवांमध्ये मंडळांना आखडता हात घ्यावा लागत आहे (Ganesh Mandal lost due to Corona).

गणेशोत्सवात लालबाग, परळमधील जवळपास सर्वच मंडळांकडे लाखो, कोट्यवधी रुपयांचे दान जमा होते. त्यामुळे येथील मंडळांना वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणे सहज शक्‍य होते. यंदा कोरोना महामारीमुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असल्याने तसेच वर्गणी, देणगी, दान जमा न झाल्याने सर्वच मंडळांच्या तिजोऱ्या खाली आहेत. त्यामुळे मंडळांना यंदा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

लालबाग मंडळाच्या वतीने वाडीतील स्थानिकांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्गणी गोळा करण्यात आली आहे. यामुळे येथील वर्गणीदारांचे सभासदत्व अबाधित राहते. ही वर्गणी फारच अल्प स्वरुपाची असते. पण याचा हातभार उत्सवाला लागतो. लालबागचा राजा गणेश मंडळाला दरवर्षी सर्व बाजूने अलंकार, पैसे, दान आणि जाहिरातीच्या माध्यमातून 11 ते 12 कोटी रुपयांची निधी मिळतो.

“लालबागचा राजा मंडळाने वर्षभर सुयोग्य नियोजन केल्यामुळे सामाजिक उपक्रम राबवणे शक्‍य झाले आहे. प्लाझ्मा दान, कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत, मोफत शस्त्रक्रिया, डायलिसीस सेंटर आणि नैसर्गिक आपत्तीतील मदत यावर कोणताच परिणाम झालेला नाही”, असं मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.

दरम्यान, यंदा लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी लालबागमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांची गर्दी नसल्याने लालबाग, परळमधील मंडळांना देणगी मिळत नाही त्यामुळे मोठा आर्थिक फटका त्यांना सोसावा लागत आहे.

संबंधित बातम्या :

CM On Lalbaug Raja | लालबागचा राजा गणेश मंडळाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ, ‘लालबागचा राजा’च्या निर्णयावर शेलारांची नाराजी