आईसोबत फिरायला गेलेल्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, CISF जवानाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

| Updated on: Aug 26, 2020 | 10:36 PM

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे (Leopard Attack in Chandrapur).

आईसोबत फिरायला गेलेल्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, CISF जवानाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे (Leopard Attack in Chandrapur). संध्याकाळी फिरायला निघालेल्या निघालेल्या आई-मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात बिबट्याने मुलीवर झडप घालून उचलून नेले. त्यानंतर शोधाशोध केली असता ही चिमुरडी एका झुडपात आढळली. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. बिबट्याच्या या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या गजबजलेल्या पर्यावरण चौकात बिबट्याच्या हल्ल्याची ही घटना घडली. संध्याकाळी फिरायला निघालेल्या निघालेल्या आई-मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी आईच्या डोळ्यासमोर बिबट्याने 5 वर्षाच्या चिमुरडीला उचलून आजूबाजूच्या जंगलातील झुडपांमध्ये धूम ठोकली. आरडाओरडा करुन गर्दी एकत्र झाल्यावर झुडपी जंगलात मुलीचा शोध घेण्यात आला. या दरम्यान नागरिकांना जखमी अवस्थेतील अर्धमेली चिमुकली आढळली.

मुलीला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिला रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरानी जखमी चिमुरडीला मृत घोषित केले. भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात सीआयएसएफ (CISF) जवानाच्या मुलीच्या मृत्यूने प्रशासन हादरलं आहे. लावण्या उमाशंकर दांडेकर-5 असं चिमुरडीचं नाव आहे. वनविभागाने या परिसरात सध्या बंदोबस्त लावला आहे.

वीज केंद्राची सुरक्षा सांभाळणाऱ्या सीआयएसएफ जवानांना याच पर्यावरण चौक भागात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महाड औष्णिक वीज केंद्राच्या या परिसरातील विस्तीर्ण जंगलात शेकडो वन्यजीव वास्तव्याला आहेत. मात्र अशा पद्धतीने हल्ला होण्याची नजीकच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेने महाऔष्णिक वीज केंद्र प्रशासन वनविभाग आणि जिल्हा प्रशासनही हादरले आहे.

आपल्या डोळ्यासमोर खेळणारी आपली मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गमावल्याने सीआयएसएफ जवानाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हल्ल्यानंतर चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची सुरक्षा करणाऱ्या जवानांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

संबंधित बातम्या :

विहिरीत पडलेल्या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन, तरंगत्या कड्यावरुन बिबट्या पिंजऱ्यात

VIRAL VIDEO : भंडाऱ्यात वाघाचा तरुणावर हल्ला, बचावासाठी तरुणाकडून अनोखी शक्कल

खेडमध्ये कुत्र्यांच्या टोळीकडून बिबट्याची शिकार

संबंधित व्हिडीओ :