VIDEO : रस्त्यावर लहानग्यांचे हात सोडून नका, अन्यथा काय होऊ शकतं ते तुम्हीच पाहा!

बीजिंग : आई-वडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हे चीनमधील एका घटनेने अधोरेखित झालं आहे. चीनच्या पूर्वेकडील शहरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ पाहून आपल्या जीवाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. काळजाचा ठोका चुकविणारा हा व्हिडीओ असून, पालकांचा हलगर्जीपणा मुलांच्या जीवावर कसा बेतू शकतो, हे या व्हिडीओतून तुम्हा-आम्हाला […]

VIDEO : रस्त्यावर लहानग्यांचे हात सोडून नका, अन्यथा काय होऊ शकतं ते तुम्हीच पाहा!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

बीजिंग : आई-वडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हे चीनमधील एका घटनेने अधोरेखित झालं आहे. चीनच्या पूर्वेकडील शहरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ पाहून आपल्या जीवाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. काळजाचा ठोका चुकविणारा हा व्हिडीओ असून, पालकांचा हलगर्जीपणा मुलांच्या जीवावर कसा बेतू शकतो, हे या व्हिडीओतून तुम्हा-आम्हाला लक्षात येईल.

घटना काय घडली?

एक आई आपल्या चिमुकलीसोबत रस्त्याने चालताना दिसत आहे. आई पुढे चालतेय, तर चिमुकली मागेच राहते. आईचं लक्ष चिमुकलीकडे नसल्याने चिमुकली थोडी मागे पडते. त्याचवेळी मागून चारचाकी गाडी येते आणि त्या चिमुकलीवरुन जाते. त्यानंतर आई आरडाओरड करुन गाडी थांबवते. मात्र, चिमुकली गाडीच्या मागच्या चाकाखाली दबली जाते. त्यानंतर घाबरलेली आई मोठमोठ्याने ओरडते, रडते.

त्यावेळी आजूबाजूचे काहीजण मदतीला धावून आले आणि गाडीचा मागील भाग उचलला. त्यानंतर चिमुकलीला बाहेर काढण्यात आले. रस्त्यावर आजूबाजूला असलेल्या लोकांनी दाखवलेली सतर्कता वाखणण्याजोगी आहे. मात्र, त्यावेळी पूर्णपणे घाबरलेली आई रस्त्यावर पडली होती.

बीजिंगस्थित चीन ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कच्या माहितीनुसार, गाडीखाली आलेल्या चिमुकलीला किरकोळ दुखापत झाली असून, तिला जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.