शिर्डीतील ऑनलाईन बुकिंगला अत्यल्प प्रतिसाद, साईदर्शनासाठी ऑफलाईन व्यवस्थेवरील ताण वाढणार?

| Updated on: Nov 22, 2020 | 11:16 AM

साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक ऑफलाईन पासेस जास्त प्रमाणात घेत आहेत. तसेच, दर्शनसाठी ऑनलाईन पासेस मिळण्यासाठीची जी व्यवस्था केलेली आहे; तिला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

शिर्डीतील ऑनलाईन बुकिंगला अत्यल्प प्रतिसाद, साईदर्शनासाठी ऑफलाईन व्यवस्थेवरील ताण वाढणार?
Follow us on

अहमदनगर : राज्य सरकारने सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर शिर्डीतील साईमंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी ऑनलाईन पासेसही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मात्र, भाविक ऑफलाईन पासेस जास्त प्रमाणात घेत आहेत. तसेच, दर्शनसाठी ऑनलाईन पासेस मिळण्याची जी व्यवस्था केलेली आहे; तिला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठीच्या ऑफलाईन पासेसच्या व्यवस्थेवरील ताण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (little response to online pass arrangement saibaba darshan)

पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे सुरु झाली. शिर्डीतील साईमंदिरदेखील भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून दिवसाला तब्बल 6 ते 8 हजार भाविकांना दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे ऑनलाईन पासेस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

मात्र, भाविक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग न करता ऑफलाईन पासेस घेत आहेत. ऑनलाईन बुकिंगला नागरिकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. तसेच, दररोज 8 हजार भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केलेली असली तरी, रोज 9 ते 10 हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साईमंदिरातील दर्शन व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच, रविवारी सुट्टीमुळे भाविकांचे प्रमाण रोजच्यापेक्षा जास्त आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी सशुल्क दर्शनासाठीदेखील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून भाविकांनी गर्दी करु नये. शक्य होईल तेवढं ऑनलाईन बुकिंग करुनच दर्शन घेण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानतंर शिर्डीतील साईमंदिर साईदर्शनासाठी खुले झाले आहे. त्यासाठी भाविकांना ऑनलाईन बुकिंग करावी लागणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली होती. शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले होतं. (little response to online pass arrangement saibaba darshan)

संबंधित बातम्या :

तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!, भाविक, पुजारी, व्यापारीही मास्कविना, ज्येष्ठांनाही मंदिरात प्रवेश

शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअ‍ॅलिटी चेक

Lockdown 5.0 | लॉकडाऊन 5 मध्ये या 10 गोष्टी पाळाव्याच लागणार!