शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअ‍ॅलिटी चेक

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साई संस्थान कर्मचारी, भाविक आणि व्यवसायिक काळजी घेतायत की निष्काळजीपणा करतायत हे जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 मराठीने खास रियालिटी चेक केला आहे.

शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअ‍ॅलिटी चेक
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Nov 17, 2020 | 1:03 PM

शिर्डी : शिर्डीचं साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं झाल्यानंतर साई दरबारी भाविकांची मांदियाळी दिसून येते. पण या सगळ्यात कोरोनाचा जीवघेणा धोका विसरता येणार नाही. अशात शिर्डी साई मंदिरात निष्काळजीपणे काम सुरू असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साई संस्थान कर्मचारी, भाविक आणि व्यवसायिक काळजी घेतायत की निष्काळजीपणा करतायत हे जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 मराठीने खास रियालिटी चेक केला आहे. यात अनेक ठिकाणी निष्काळजीपणा होत असल्याचं समोर आलं. (temple started in Shirdi but devotees and administration are not following rules here is reality check)

शिर्डीत प्रवेश केल्यानंतर रस्तेच्या कडेला दुकानात बसलेले दुकानदार मास्क न घालता किंवा मास्क खाली ओढून ठेवत असल्याचं समोर आलं आहे. सोशल डिस्टंसिंगचंही पालन होत नाही आहे. साई मंदिर परिसरात असलेल्या फूल-हार तसंच इतर साहित्य विक्रेते ही बिनदास्त विना मास्क दिसून आले. मास्क का घातला नाही असं विचारलं असता अनाठायी उत्तरं मिळाली. इतकंच नाही तर काहींनी मास्क खिशात ठेवला आणि काहीजण मास्क बाळगत नसल्याचंदेखील उघड झालं

व्यवसायिकानंतर भाविकांचंही तेच उदाहरण समोर आलं. काही भाविकदेखील एकत्र गर्दी करत विनामास्क फिरत होते. द्वारकामाई मंदिर परिसरात हे चित्र समोर आलं आहे. रस्त्यावरदेखील साहित्य विकणारे विनामास्क विक्री करत होते. मास्कबद्दल विचारल्यावर घरी विसरलो असं एका‌ साहित्य विक्रेत्याने सांगितलं.

ऑफलाइन पास काउंटरवर मात्र भाविकांकडून शिस्तीच पालन होतोना दिसलं. संस्थानचे कर्मचारीदेखील वेळोवेळी अनाउसिंग करून भक्तांना नियमांचं पालन करण्याच्या सुचना करत आहेत. मंदिरात प्रवेश देताना सामाजिक अंतर ठेवलं जातं आहे की नाही याची पाहणी होत आहे. तर सॅनिटायझरचे बंधन आणि थर्मल स्कॅनिंगही वेळीवळी होत आहे.

खरंतर, नगर जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57 हजार 393 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.34 टक्के इतकं आहे. दरम्यान, काल रूग्ण संख्येत 181ने वाढ झाली आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1279 इतकी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह मंदिर प्रशासन आणि व्यवसायिकांनी देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याची‌ गरज निर्माण झाली आगे. मंदिर खुली झाली असली तरी कोरोना संपलेला नाही हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे प्रशासनासह भाविकांनीही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या –

Shirdi | राज्यातील सर्व मंदिरं आज उघडणार, शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी खुलं

शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय; पण ऑनलाईन बुकिंग सक्तीची!

(temple started in Shirdi but devotees and administration are not following rules here is reality check)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें