LIVE : पुण्यात महिलांकडून दारु अड्डा उध्वस्त

राज्यासह देशातील प्रत्येक घडामोडीच्या अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर...

LIVE : पुण्यात महिलांकडून दारु अड्डा उध्वस्त
Nupur Chilkulwar

|

Jun 05, 2019 | 9:29 AM

[svt-event title=”पुण्यात महिलांकडून दारु अड्डा उध्वस्त” date=”05/06/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] पुणे : महिलांकडून दारु अड्डा उध्वस्त, खडकवासला भागातील गावठी दारुच्या भट्टीकडे पोलिसांचं दुर्लक्ष, महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दारुचे ड्रम फोडले, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ महिलांचा दारु अड्ड्यावर हल्लाबोल, पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या लमान वस्ती आणि लांडगे वस्ती येथील अड्डा उध्वस्त, खडकवासला धरण परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारु विक्री, स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा महिलांचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”वादळी वाऱ्यामुळे पाच वर्षीय मुलाचा मृत्यू” date=”05/06/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाली, पत्र्यावरील दगड-विटा डोक्यावर पडल्याने पाच वर्षीय मुलाचा मृत्यू, माढा तालुक्यातील भोगेवाडी येथील घटना [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात वन विभागाच्या कार्यालयात स्फोट” date=”05/06/2019,9:06AM” class=”svt-cd-green” ] पुणे : मुळशी येथील वन विभागाच्या कार्यालयात स्फोट, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”अवकाळी पावसामुळे वर्ध्यात मोठं नुकसान” date=”05/06/2019,9:05AM” class=”svt-cd-green” ] वर्धा : वर्ध्यात काल (4 जून) संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे देवळी, सेलसुरा, तळेगाव, धानोडी येथे मोठं नुकसान, देवळीत 10 घरांचे छप्पर उडाले, अनेक गावांचा वीज पुरवठा रात्रीपासून खंडित, धानोडी येथे विद्युत खांब जमिनदोस्त [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी-चिंचवडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग” date=”05/06/2019,8:06AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवड : कुदळवाडी विसावा चौक परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, रात्री दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती, आगीत 15 ते 17 दुकानं जळून खाक, आग लोकवस्तीच्या जवळ लागली, मशीद शेजारील खोल्यांमधून वेळीच लोकांना बाहेर काढल्याने कुठलीही जीवितहानी नाही, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश [/svt-event]

[svt-event title=”विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट ” date=”05/06/2019,8:06AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी, मॉन्सून उशिराने येत असल्याने आणखी काही दिवस उकाडा कायम राहाणार, विदर्भात मॉन्सून आठवडाभर उशिराने येण्याचा हवामान विभागाचा अंदाज, विदर्भात 15 ते 16 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज [/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने” date=”05/06/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने, डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल [/svt-event]

[svt-event title=”गायीच्या दुधाला 30 रुपये लिटर दर देण्याची मागणी” date=”05/06/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] पुणे : गायीच्या दुधाला 30 रुपये लिटर दर द्या, दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची मागणी, पॉलिथिन पिशव्यांसाठी पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत संघावर कारवाई करू नये, कारवाई झाल्यास सरकारला जाब विचारण्याचा इशारा, पुण्यात झालेल्या निर्धार बैठकीत संघाचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात दोन गटात तुफान दगडफेक” date=”05/06/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : घीसाड गल्ली परिसरात दोन गटात तुफान दगडफेक, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त, दगडफेकीत 3 पोलीस, 5 नागरिक जखमी [/svt-event]

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें