AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोलीत जाऊन मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवाद्यांना सोडणार नाही!

गडचिरोली : गडचिरोतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा परिसरात काल नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात C-60 दलाचे 15 जवान शहीद झाले. या सर्व शहिदांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत दाखल होत, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. गडचिरोलीत काल झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर आज मुख्यमंत्री स्वत: गडचिरोलीत दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पोलिस मुख्यालयात शहीद जवानांना […]

गडचिरोलीत जाऊन मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवाद्यांना सोडणार नाही!
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM
Share

गडचिरोली : गडचिरोतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा परिसरात काल नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात C-60 दलाचे 15 जवान शहीद झाले. या सर्व शहिदांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत दाखल होत, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

गडचिरोलीत काल झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर आज मुख्यमंत्री स्वत: गडचिरोलीत दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पोलिस मुख्यालयात शहीद जवानांना मानवंदना दिली आणि श्रद्धांजली वाहिली. त्याशिवाय शहीद जवानांच्या कुटुंबाला भेट देत त्यांचं सांत्वनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

”गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिलेत. या हल्ल्याचा प्रत्युत्तरही नक्षलवाद्यांना दिलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. तसेच या शहीद जवानांच्या परिवाराच्या पाठीशी सरकार कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं”.

शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाख

दरम्यान, गडचिरोलीतील शहीद जवानांच्या वारसांना 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकार याबाबतची घोषणा करणार आहे. तसंच शहीद जवानांच्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि निवृत्तीच्या कालावधीपर्यंत पगार देण्यात येणार आहे.

हल्ला नेमका कुठे झाला?

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा आणि लेंढारी गावादरम्यान बुधवारी 1 मे रोजी ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. काल नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला.

गडचिरोली येथील जांभूरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य केले. या हल्यात 15 जवान शहीद झाले. तर 1 ड्रायव्हरचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर कुरखेडा तालुक्यातून पुरडा येथे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी सध्या कोबिंग अँड सर्च ऑपरेशन  सुरु आहे. तसंच अँटी माईल वेहिकलचा वापर करत या ठिकाणी अजून भुसुरुंग पेरले आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष केले. यात 15 जवान शहीद झालेत. या सर्व शहीद जवानांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर जवानांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सध्या या शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरु आहेत.

संबंधित बातम्या: 

जवनांचा मृत्यू होईपर्यंत 100 नक्षलवादी थांबले, हल्ला नेमका कसा झाला?

गडचिरोली हल्ला :  जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण

गडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश

जनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले

नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक

गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?

आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!

गडचिरोली हल्ला : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...