गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद

गडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 16 जवान शहीद झाले आहेत. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी काल रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर आज पुन्हा …

गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद

गडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 16 जवान शहीद झाले आहेत. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी काल रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर आज पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.

पोलिसांच्या शीघ्र कृती दलावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले. सी 60 तुकडीचे हे सर्व जवान होते. गस्तीवर जाणाऱ्या जवानांना लक्ष्य करुन नक्षल्यांनी हा हल्ला केला.

खासगी वाहन, खासगी ड्रायव्हर : दीपक केसरकर

गडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान आणि गाडीचा ड्रायव्हर शहीद झाला. याबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. “नक्षलवादी पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करतात हे ध्यानात ठेवून, जवान खासगी वाहनातून जात होते. ही गाडी खासगी होती. या गाडीचा ड्रायव्हरही खासगी होता”, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

हल्ला नेमका कुठे झाला?

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. काल नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला.

नक्षवाद्यांना माहित होत गाड्या जाळल्यानंतर तपासासाठी पोलीस येणार. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सापळा लावला होता, असं म्हटलं जात आहे.

MAP : हल्ला नेमका कुठे झाला?

राज्यपालांचे चहापान रद्द

गडचिरोली येथे आज पोलिसांवर झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज (बुध. 1) संध्याकाळी राजभवन येथील चहापान आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला आहे. राज्यपालांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे मान्यवर निमंत्रितांसाठी तसेच विविध देशांच्या प्रतिंनिधींसाठी चहापान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र त्यांनी ते रद्द केलं.

LIVE UPDATE : 

  • गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध
  • गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्कात आहे – केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह
  • मुख्यमंत्र्यांकडून नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध, तसेच पोलिस महासंचालक आणि गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांसोबतही संपर्कात असल्याची मुख्यमंत्र्यांकडून माहिती
  • गडचिरोलीत मोठ्या संख्येत मतदान झाल्याने, हतबलतेतून नक्षलवाद्यांचे हे कृत्य – माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित

 • गडचिरोलीत पोलिसांच्या क्वीक रिस्पॉन्स टीमवर नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, 15 जवान आणि एक चालक शहीद
 • जवानांच्या गाड्या जाण्याआधी पाहणी करणं आवश्यक – माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत
 • नक्षलवाद्यांकडून लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार
 • गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाल्याची आतापर्यंत माहिती मिळलीय – सुधीर मुनगंटीवार
 • गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा हल्ला अत्यंत दुर्दैवी, निषेध करावा तेवढा कमीच – सुधीर मुनगंटीवार

 • गडचिरोलीत 24 तासात नक्षलवाद्यांचा दुसरा हल्ला
 • नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीत रक्तपात, आयईडी स्फोटात 16 जवान शहीद

 • नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात 16 जवान शहीद
 • महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत रक्तपात
 • जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांकडून स्फोट

 

कोट्यवधीची 30 वाहने पेटवली

दरम्यान, नक्षलवाद्यांनी काल रात्रीच धुमाकूळ घालत रस्त्याच्या कामासाठी आणलेली तब्बल 30 वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली आहेत. रस्त्याचे काम सुरु असताना, नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराला काम बंद करण्यासाठी दोनवेळा धमकी दिली होती. मात्र तरीही काम सुरुच राहिल्याने नक्षलवाद्यांनी वाहने पेटवून दिली. यामध्ये ट्रक ,ट्रॅकटर, जेसीबी, बोलेरो अशी जवळपास 30 वाहनांचा कोळसा झाला आहे. कुरखेडा तालुक्यात दादापूर इथं ही घटना घडली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेली वाहने जवळपास दहा ते 12 कोटी रुपयांची आहेत. 60 ते 70 नक्षलवादी रात्री एक वाजता घटनास्थळी आले आणि त्यांनी मजुरांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी वाहनांमधील डिझेल काढून ती वाहने पेटवून दिली. छत्तीसगड सीमा भागातून हे नक्षलवादी आल्याची माहिती मिळत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *