आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!

गडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान आणि गाडीचा ड्रायव्हर शहीद झाला. या हल्ल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी काल पेटवलेल्या 30 गाड्या हा त्यांचा ट्रॅप होता. या पेटवलेल्या गाड्यांच्या तपासासाठी पोलीस येणार हे नक्षलींना माहीत होतं. त्यामुळेच नक्षलींनी ते हेरुन स्फोट घडवल्याचं सांगण्यात येत आहे. …

IED blast by Naxals on a police vehicle in Gadchiroli, आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!

गडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान आणि गाडीचा ड्रायव्हर शहीद झाला. या हल्ल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी काल पेटवलेल्या 30 गाड्या हा त्यांचा ट्रॅप होता. या पेटवलेल्या गाड्यांच्या तपासासाठी पोलीस येणार हे नक्षलींना माहीत होतं. त्यामुळेच नक्षलींनी ते हेरुन स्फोट घडवल्याचं सांगण्यात येत आहे.

या धक्कादायक माहितीमुळे प्रशासन हा ट्रॅप समजण्यास कमी पडल्याचं स्पष्ट होत आहे. नक्षलवादी इतकी मोठी चाल करतात, मात्र त्याचा थांगपत्ताही गुप्तचर विभाग किंवा प्रशासनाला लागत नाही, हे आश्चर्यकारक आहे.

हल्ला नेमका कुठे झाला?

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. काल नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती.  ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी  पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला.

नक्षवाद्यांना माहित होत गाड्या जाळल्यानंतर तपासासाठी पोलीस येणार. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सापळा लावला होता, असं म्हटलं जात आहे.

भ्याड नक्षली हल्ला

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवानांसह एक ड्रायव्हर शहीद झाले आहेत. पोलिसांच्या शीघ्र कृती दलावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले. सी 60 तुकडीचे हे सर्व जवान होते. गस्तीवर जाणाऱ्या जवानांना लक्ष्य करुन नक्षल्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी काल रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर आज पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

“नक्षलवादी पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करतात हे ध्यानात ठेवून, जवान खासगी वाहनातून जात होते. ही गाडी खासगी होती. या गाडीचा ड्रायव्हरही खासगी होता”, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी टीव्ही 9 ला दिली.

शीघ्र कृतीदलाचे जवान होते. 15 जवान आणि 1 ड्रायव्हर होता. खासगी वाहन होतं. पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला जातो, त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास सुरु होता, त्यावेळी हा दुर्दैवी प्रकार झाला. एकदंरीत जो प्रकार घडला आहे, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.

संबंधित बातम्या 

गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद   

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्ते करण्यासाठी आणलेली 30 वाहने पेटवली   

आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *