Minister Raksha Khadse : मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड; महिला आयोगाने घेतली दखल
Rupali Chakankar Reaction On Jalgaon Crime : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणाची दखल आता महिला आयोगाने घेतली आहे. टावळखोर तरूणांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या टावळखोरांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली असल्याचं समोर आलं आहे.
जळगावमधल्या मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जर मंत्र्यांच्या मुलीच सुरक्षित नसतील तर राज्यातल्या सामान्य महिलांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकारानंतर आता महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी याबद्दल आपण मुक्ताईनगरच्या पीआयसोबत बोललो असून या टवाळखोरांवर कडक कारवाई होईल अशी माहिती दिली आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
