संपत्तीच्या वादातून बारामतीत पित्याची गोळ्या झाडून हत्या, मुलाचा स्वतःवरही गोळीबार

| Updated on: Mar 29, 2020 | 5:04 PM

संपत्तीच्या वादातून पित्यावर गोळीबार (Man shoot on father) करुन स्वत:वरही गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातल्या कोऱ्हाळे बुद्रुक येथे घडली.

संपत्तीच्या वादातून बारामतीत पित्याची गोळ्या झाडून हत्या, मुलाचा स्वतःवरही गोळीबार
Follow us on

पुणे : संपत्तीच्या वादातून पित्यावर गोळीबार (Man shoot on father) करुन स्वत:वरही गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातल्या कोऱ्हाळे बुद्रुक येथे घडली. बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक दीपक खोमणे यांनी आपले वडील धनवंत धोंडीबा खोमणे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळ्या झाडल्या. या घटनेत धनवंत खोमणे यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपक खोमणेंची प्रकृती गंभीर आहे (Man shoot on father). त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दीपक खोमणे आणि त्यांचे वडील धनवंत खोमणे यांच्यात जमिनीवरुन वाद होता. जमिनीवरुन त्यांचं अनेकदा भांडण झालं आहे. अनेकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांच्यातील वाद मिटत नव्हता. दीपक खोमणे आज शेतात गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील धनवंत खोमणे देखील शेतात होते.

यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. दीपक खोमणे यांनी स्वत: जवळील रिवॉल्वरने वडिलांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळ्या झाडल्या. या घटनेत धनवंत खोमणे यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपक खोमणे यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी बारामतीतील खासगी रुग्णालयात गर्दी केली. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रगतीशील शेतकरी कुटुंबात संपत्तीचा वाद थेट जीवावर बेतल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.