पुण्यातील भाजप नगरसेवक गोळी लागल्याने जखमी, मांडीतून गोळी आरपार

पुणे : भाजपचे पुण्यातील स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. गणेश बीडकर हे शिक्रापूरजवळ आपटी गावात 35 एकर जागेत असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारक बंदुकीतून गोळी सुटल्याचं सांगितलं जातंय. मांडीतून गोळी आरपार गेल्याने हा प्रकार नक्की कशामुळे घडला असावा याबद्दल तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. पिस्तुल साफ करताना […]

पुण्यातील भाजप नगरसेवक गोळी लागल्याने जखमी, मांडीतून गोळी आरपार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

पुणे : भाजपचे पुण्यातील स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. गणेश बीडकर हे शिक्रापूरजवळ आपटी गावात 35 एकर जागेत असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारक बंदुकीतून गोळी सुटल्याचं सांगितलं जातंय. मांडीतून गोळी आरपार गेल्याने हा प्रकार नक्की कशामुळे घडला असावा याबद्दल तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.

पिस्तुल साफ करताना मिसफायर झाल्याने ही गोळी लागली. जखमी बीडकर यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बीडकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. गोळी लागताच त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.

कोण आहेत गणेश बीडकर?

पुणे महापालिका निवडणुकीत गणेश बीडकर यांचा पराभव झाला होता. पण भाजपने त्यांचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलं. 2012 च्या पुणे महापालिका निवडणुकीत गणेश बीडकर निवडून आले होते आणि ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. गणेश बीडकर हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातं.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.