AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, PBKS vs CSK : चेन्नईने पंजाबला पराभूत केल्यानंतर ऋतुराज गायकवाडने सांगितलं इम्पॅक्ट प्लेयर्सचं गणित

आयपीएल 2024 स्पर्धेत षटकार आणि चौकारांचा वर्षाव होताना क्रीडाप्रेमींनी पाहिला आहे. त्यामुळे 200 पार धावसंख्या करूनही त्या रोखणं म्हणजे कठीण काम होतं. मात्र चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला 20 षटकात 167 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 139 धावा करू शकला. यात इम्पॅक्ट प्लेयर्सचं गणित महत्त्वाचं ठरलं.

IPL 2024, PBKS vs CSK : चेन्नईने पंजाबला पराभूत केल्यानंतर ऋतुराज गायकवाडने सांगितलं इम्पॅक्ट प्लेयर्सचं गणित
| Updated on: May 05, 2024 | 7:57 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 53वा सामना पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 28 धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून पंजाब किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सला 20 षटकात 167 धावांवर रोखलं. विजयासाठी मिळालेल्या 168 धावा पंजाब सहज गाठेल असं वाटत होतं. मात्र पंजाबच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 20 षटकात पंजाबचा संघ 9 गडी गमवून 139 धावा करू शकला. या सामन्यातील एका रणनिती चर्चा होत आहे. चेन्नईचे फलंदाज झटपट बाद होत असताना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजाला उतरवलं अशी शक्यता वाटत होती. महेंद्रसिंह धोनीही खुद्द नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरला होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात नेमकं काय सुरु आहे हे कळत नव्हतं. धावांची गती वाढवण्यासाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाज उतरवणार असं वाटत होतं. मात्र तसं काही केलं नाही. समीर रिझवी, सिमरजीत सिंग, शाईक रशीद, मुकेश चौधरी आणि प्रशांत सोलंकी असे इम्पॅक्ट प्लेयर्स होते. मात्र दुसऱ्या डावात सिमरजीत सिंगला संधी दिली. यामागचं गणित सामन्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड याने उघड केलं.

“आम्हाला माहिती होतं की विकेट खूपच स्लो आहे. चेंडूही फार काही उसळी घेत नव्हता. आम्ही सुरुवातीला 180-200 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण विकेट गमवल्यानंतर ठरलं की 160-170 ही धावसंख्या चांगली आहे.” असं कर्णधार ऋतुराज गायकवाड याने सांगितलं. “आम्ही इम्पॅक्ट बॅटरसोबत जाण्याचा विचार करत होतो. पण नंतर आम्ही गणित मांडलं तेव्हा तो जास्तीत 10-15 धावा करेल असं गृहीत धरलं. त्याऐवजी गोलंदाज 2-3 विकेट मिळवून देऊ शकतो.”, असं ऋतुराज गायकवाड याने इम्पॅक्ट प्लेयरचं गणित सांगितलं. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सिमरजीत सिंगला संधी दिली.

सिमरजीत सिंगने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून चांगली कामगिरी केली. 3 षटकात फक्त 16 धावा देत दोन महत्त्वाचे गडी बाद केले. सिमरजीतने पहिल्या षटकात 4 धावा देत एक गडी बाद केला. दुसऱ्या षटकात फक्त एक धाव दिली. त्यानंतर तिसऱ्या षटकात 11 धावा देत एक आणखी गडी बाद केला. यामुळे पंजाब किंग्सला डोकं वर काढताच आलं नाही. या सामन्यातील विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.