Mission Mangal : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट, पहिल्या दिवसाची कमाई …

स्वांतत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या मुर्हूतावर प्रदर्शित झालेला मिशन मंगल (Mission Mangal) चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे.

Mission Mangal : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट, पहिल्या दिवसाची कमाई ...

मुंबई : स्वांतत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या मुर्हूतावर प्रदर्शित झालेला मिशन मंगल (Mission Mangal) चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. मिशन मंगलने एका दिवसात तब्बल 29 कोटी 16 लाख रुपयांची गल्ला जमावला आहे. विशेष म्हणजे मिशन मंगल (Mission Mangal) हा अक्षय कुमारच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

पहिल्या दिवशी बंपर कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये मिशन मंगलने दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भारत चित्रपट आहे. भारतने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 42 कोटी 30 लाख रुपयांची कमाई केली होती.

पहिल्या दिवशी बंपर कमाई करणारे चित्रपट

1. भारत: 42 कोटी 30 लाख
2. मिशन मंगल : 29 कोटी 16 लाख
3. कलंक : 21.60 करोड़
4. केसरी 21.06 करोड़
5. टोटल धमाल : 16.50 करोड़

गेल्यावर्षी स्वातंत्र्य दिनी अक्षय कुमारचा गोल्ड चित्रपट प्रदर्शित झाला होता. गोल्ड चित्रपटाने 25 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर 2019 मध्ये रिलीज झालेल्या केसरी चित्रपटाने 21 कोटी 50 लाखांची कमाई केली होती. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीची चित्रपट प्रदर्शनाची परंपरा यंदाही अक्षयने कायम ठेवली आहे. अक्षय कुमारच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने रेकॉर्ड बनवले आहे.

अक्षयच्या करिअरमधील पहिल्या दिवशी बंपर कमाई करणारे चित्रपट

2016: रुस्तम (14 कोटी 11 लाख)
2017: टॉयलेट एक प्रेमकथा (13 कोटी 10 लाख)
2018: गोल्ड (25 कोटी 25 लाख)
2019: मिशन मंगल (29 कोटी 16 लाख)

भारताच्या मंगळ मोहिमेची वास्तववादी कथा मिशन मंगल (Mission Mangal) या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 24 सप्टेंबर 2014 मध्ये इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहाच्या कक्षेत सॅटलाईट लॉन्च केले होते. पहिल्याच प्रयत्नात आणि कमी बजेटमध्ये ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडणारा भारतात हा जगातील एकमेव देश आहे. मंगळयान बनवणे हे भारतापुढील मोठे आव्हान होते. कारण हे यान घडवण्यासाठी लागणारा खर्च हा भारताला परवडण्यासारखा नव्हता. परंतु राकेश धवन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अशक्य आव्हान पेलले आणि भारताची मंगळ स्वारी यशस्वी झाली, हेच मनोरंजक पध्दतीनं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, विक्रम गोखले, शर्मन जोशी, नित्या मेनन, किर्ती कुल्हेरी, दलिप ताहिल या कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. मिशन मंगल चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षयच्या दमदार अभिनयासोबतच अभिनेत्री विद्या बालननेही यात उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI