मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली

| Updated on: May 06, 2020 | 5:09 PM

दरवर्षीची उन्हाळ्यात होणारी पाण्याची वणवण कमी व्हावी यासाठी या कुटुंबाने घरी बसण्यापेक्षा विहीर खोदण्याचा निर्णय (Well Dug By family during lockdown) घेतला.

मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली
Follow us on

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात (Well Dug By family during lockdown) आलं आहे. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. संचारबंदी आणि जमावबंदी असल्याने अनेकांपुढे जगण्याचे मोठे संकट उभे राहिले. तर काहींना घरबसल्या आता काय करावे असे प्रश्न पडू लागेल. मात्र संकटातही न डगमगता तळवली आगरवाडी येथील दिलीप आग्रे यांनी या आपल्या कुटुंबाला सोबत घेत विहीर खणली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाची दरवर्षी पाण्याची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव (Well Dug By family during lockdown) कमी करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच नागरिकांना घरातच बसावे लागत आहे. अनेक जण मुंबई पुण्यात अडकून पडले आहेत. तर शिमगोत्सवाला गावी आलेले काही कोकणवासीही गावीच अडकून पडले आहेत.

मात्र या संधीचे सोने करण्याचा विचार तळवली अगरवाडीतील दिलीप आग्रे यांनी केला. आपली दरवर्षीची उन्हाळ्यात होणारी पाण्याची वणवण कमी व्हावी यासाठी या कुटुंबाने घरी बसण्यापेक्षा विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर म्हणत 14 एप्रिलपासून लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात विहीर खोदण्याला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या 15 ते 20 दिवसात विहिरीला पाणी लागले.

दिलीप आग्रे यांचे कुटुंब एकत्र पध्दतीचे आहे. त्यामुळे घरामध्ये जवळपास 20 ते 22 माणसे आहेत. या सर्वांच्या एकीच्या आणि जिद्दीच्या जोरावर या कुटुंबाने हे काम यशस्वीपणे पार पाडले. यामुळे सर्वांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. या अनोख्या कामासाठी दिलीप आग्रे, श्रीधर आग्रे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे.

“आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. मात्र अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने मुंबईतील कुटुंब सदस्य गावीच अडकून पडले. आम्हाला दरवर्षी उन्हाळ्यात भासणारी पाण्याची चणचण आमच्या नजरेसमोर आली. यामुळे आम्ही घरी बसण्याऐवजी विहीर खोदण्याचा विचार केला. सर्व सदस्यांनी होकार दिल्यावर अवघ्या 15 ते 20 दिवसात आम्ही विहीर खणली,” असे दिलीप आग्रे म्हणाले.

“अवघ्या काहीच अंतरावर पाणी मुबलक प्रमाणात पाणी मिळाल्याने आमच्या श्रमाचे चीज झाले आहे. तसेच लॉकडाऊन काळातील वेळही वाया गेली नाही. या पाण्याचा वापर घरगुती आणि भाजीपाला पिकवण्यासाठी तसेच गरजूंना मोफत देण्यासाठी आम्ही करणार आहे. तसेच माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी यासाठी मोलाची मेहनत घेतली,” असेही दिलीप आग्रे यांनी (Well Dug By family during lockdown) सांगितले.

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनमुळे 10 बाय 10 च्या घरात लग्न, पोलीस वऱ्हाडी, 5-6 जणांची हजेरी

पोलीस मामाच्या भूमिकेत, लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमेवरच शुभमंगल