
यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी येथे होणार आहे.

मुंबई आणि बंगळुरुच्या संघांना यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.

मुंबईचा खेळाडू जसप्रीत बुमराहला 1 विकेट मिळाल्यास त्याच्या आयपीएलमधील 100 विकेट पूर्ण होणार आहेत.

मुंबई आणि बंगळुरुने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन्ही संघानी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांमध्ये यापूर्वी झालेल्या सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागला हा सामना बंगळुरूनं जिकंला.

बंगळुरूचा यंदाच्या हंगामातील मुंबईवर दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न राहील.