मुंबईत 9 महिन्याच्या गर्भवतीचा कोरोनाबळी, राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशीचे आदेश

एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबईत 9 महिन्याच्या गर्भवतीचा कोरोनाबळी, राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशीचे आदेश

मुंबई : भारतासह महाराष्ट्रातही कोरोनाने थैमान घातलं (NCW inquiry pregnant woman Corona death) आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. तसेच कोरोनाबळींच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू (NCW inquiry pregnant woman Corona death) झाला होता. या महिलेला वैद्यकीय सेवेसाठी 70 किमीचा प्रवास करावा लागला होता. हा सर्व प्रकार धक्कादायक प्रकारानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने याबाबतच चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय? 

नालासोपारा भागात  एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेला उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र शनिवारी 4 एप्रिलला संध्याकाळी या महिलाचा मृत्यू झाला. या महिलेचे वय 30 वर्षे होते.

अशाप्रकारे गर्भवती महिलेचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. या महिलेसह बाळाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  या महिलेच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला होता.

दरम्यान, आज (10 एप्रिल) महाराष्ट्रात 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 364 वरुन 1 हजार 380 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 380 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत (NCW inquiry pregnant woman Corona death) आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI