AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानपदावरून नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर घणाघात; म्हणाले, प्रत्येक वर्षी एक…

PM Narendra Modi on India Alliance Loksabha Election 2024 ; सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीवर त्यांनी निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

पंतप्रधानपदावरून नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर घणाघात; म्हणाले, प्रत्येक वर्षी एक...
| Updated on: Apr 29, 2024 | 2:59 PM
Share

सोलापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी सोलापुरात आहेत. सोलापुरातील होम मैदानावर ही सभा होत आहे. सोलापुरात बोलताना नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. माझ्या प्रिय सोलापूरकरांना मनापासून नमस्कार, जय जय राम कृष्ण हरी… सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण सुरु केलं. याच भाषणात पंतप्रधानपदावरून नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.

इंडिया आघाडीवर घणाघात

पूर्वीच्या सरकारने देशाला भ्रष्टाचार, आतंकवाद, कुकर्मात ढकलले होते. पहिल्या दोन टप्प्यात इंडिया आघाडीचा डबा गुल झाला आहे. तुमचा सेवक मोदी हा डोकं झुकवून तुमच्याकडे येत असतो. इंडिया आघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरू आहे. ज्याचे नाव ठरलेले नाही. ज्याचा चेहरा ठरलेला नाही अशा लोकांच्या हातात देश देणार का?, असा सवाल मोदींनी केला आहे.

इंडिया आघाडीने नवा फॉर्मुला आणला आहे. पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा फॉर्मयुला आणला आहे. प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान करणार आहेत. नकली शिवसेनावाले म्हणतात आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत. एवढा मोठा देश पाच पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली चालू शकतो का? इंडिया गाडीला देश चालवायचा नाही तर मलई खायची आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे.

लोकांनी दोन्ही सरकारचं काम पाहिलंय- मोदी

महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. ज्योतिबा फुले, डॉक्टर आंबेडकर असे महापुरुष दिलेत. काँग्रेसचे साठ वर्ष आणि मोदीचे दहा वर्षे लोकांनी पाहिले आहेत. मागील दहा वर्षात सामाजिक न्यायासाठी जेवढे काम झाले तेवढे स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत झाले नाही. काँग्रेसवाल्यानी SC, ST, OBC वर्गाला हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम केलेय. पण आपले हृदयाचे संबंध आहेत. आमच्या अहमदाबादमध्ये अनेक पद्मशाली समाजाचे लोक आहेत. दर आठवड्यातून एकदा तरी पद्मशाली समाजाच्या घरी मी जेवण केलं आहे. मी पद्मशाली समाजाच्या लोकांचे मीठ खाल्ले आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.