सुशांत सिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला अटक

| Updated on: Sep 04, 2020 | 10:34 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनसंबंधी एनसीबीने मोठी कारवाई केली आहे (NCB arrest Rhea Chakraborty brother Showik Chakraborty).

सुशांत सिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला अटक
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनसंबंधी एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली आहे. त्याचबरोबर सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडा यालादेखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे (NCB arrest Rhea Chakraborty brother Showik Chakraborty).

एनसीबीने आज (4 सप्टेंबर) गांजा व्यापारी जैसेन, सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक याला चोकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अनेक तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने शोविकला अटक केली. याप्रकरणी उद्या (5 सप्टेंबर) शोविक आणि मिरांडा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याचबरोबर एनसीबी रियालाही समन्स बजावण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही गांजा बाळगल्याप्रकरणी एनसीबीने चौघांना अटक केली होती. त्यामध्ये पहिली अटक अब्बास रमझान अली याची झाली. त्याच्याकडे 46 ग्राम गांजा मिळाला. त्याने आपण हा गांजा कर्ण अरोरा यांच्याकडून घेतल्याचं सांगितल्यावर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पवई येथून कर्ण अरोरा याला अटक केली. त्याच्याकडे 13 ग्राम गांजा मिळाला. या दोघांच्या चौकशीत झैद विलात्रा याच नाव पुढे आल्याने त्याला ही 2 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली (NCB arrest Rhea Chakraborty brother Showik Chakraborty).

शोविकच्या सांगण्यावरुन गांजा विकत घेत होतो, एनसीबीच्या चौकशीत अबीदचा खुलासा

झैद याच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय चलन आणि परदेशी चलन सापडलं होतं. हे पैसे गांजाच्या विक्रीतून त्याला मिळाले होते. चौकशीत त्याने त्याच्याकडून गांजा विकत घेणाऱ्या अनेकांची नाव उघड केली. झैद याने अबीद बसिद परिहार हा देखील गांजा विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असल्याचं सांगितल्याने अबीद याला ही अटक करण्यात आली.

अबीदने आपण हा गांजा शोविक याच्या सांगण्यावरुन विकत घेत होतो आणि तो सॅम्युल मिरांडा याला देत होतो, असं सांगितलं आहे. अब्दुल बसीदच्या चौकशीत फिल्म क्षेत्रातील अनेक लोकांची नाव उघड झाली आहेत. त्याची आता चौकशी सुरु आहे. यावेळी शोविक याचं नाव आल्याने त्याला आणि मिरांडा या दोघांना एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं.