
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईहून जळगावला जात आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

मुंबईतील मुलुंड आणि विक्रोळी येथे एकनाथ खडसेंचे स्वागत करण्यात आले.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहे.

एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पहिल्यांच्या त्यांच्या मतदारसंघात म्हणजे मुक्ताईनगर येथे जात आहेत. यादरम्यान ठिक-ठिकाणी खडसेंचं स्वागत होत आहे.

ठाणे येथेही एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांचे स्वागत करण्यात आले.

भिंवडी येथे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, खडसेंचे समर्थक उपस्थित होते.

कल्याण बायपास येथे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वागत आणि सत्कार केला.

शहापूर येथे आमदार दौलत दरोडा यांनी एकनाथ खडसेंचे स्वागत आणि सत्कार केला. याप्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेय

आमदार माणिकराव कोकाटे यांनी इगतपुरी येथे एकनाथ खडसेंचे स्वागत केले.