चंद्रयान 2 मोहिमेचे पाकिस्तानकडूनही भारताचे कौतुक

| Updated on: Jul 28, 2019 | 4:56 PM

चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) यशस्वी प्रक्षेपणानंतर संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. याशिवाय भारताचा शेजारी देश पाकिस्तानच्या जनतेनेही चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) प्रक्षेपणाचे कौतुक केलेले आहे.

चंद्रयान 2 मोहिमेचे पाकिस्तानकडूनही भारताचे कौतुक
Follow us on

नवी दिल्ली : चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) यशस्वी प्रक्षेपणानंतर संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. याशिवाय भारताचा शेजारी देश पाकिस्तानच्या जनतेनेही चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) प्रक्षेपणाचे कौतुक केलेले आहे. पाकिस्तानच्या लाहोरमधील एक युट्यूबर (Youtuber) साना अमजदच्या एका व्हिडीओमध्ये चंद्रयान 2 वर पाकिस्तानी जनतेने आपलले मत मांडले आहे. यामध्ये पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाने पाकिस्तानने भारताकडून शिकण्याची गरज आहे, असं वक्तव्य केलेलं दिसत आहे.

युट्यूबर साना अमजदच्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती म्हणाला, “भारताने चांगले पाऊल उचललं आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भारत नेहमी पुढे असतो. पाकिस्तानने यामधून शिकणे गरजेचे आहे”.

“भारताच्या या कामगिरीचे आम्ही कौतुक करतो. आपल्याला भारताकडून शिकले पाहिजे”, असंही या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती म्हणाला.

दरम्यान, काही लोकांनी भारताच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच भारताच्या प्रगतीमधून पाकिस्तानच्या तरुणांनी खूप काही शिकणे गरजेचे आहे. त्यासाठी देशाने आणि तरुणांनी तंत्रज्ञान क्षेत्रात गुतंवणूक करणेही गरजेचे आहे, असंही या व्हिडीओमध्ये अन्य एक व्यक्ती म्हणाला.

पाकिस्तानशिवाय अमेरिका आणि जर्मनीसह इतर देशातील राजदुतांनीही भारताच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भारताने 22 जुलै रोजी चंद्रयान 2 चे यशस्वी प्रक्षेपण केले. चंद्रयान 2 निर्धारित कार्यक्रमानुसार 20 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचणार आहे.